राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश एस. पाटील यांचा भावपूर्ण सेवासत्कार तर प्रा. कृष्णा रानगर यांनी प्रभारी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला*

👤 सतीशकुमार पडोळकर | 📅 06 July 2026 | 👁 319 Views
राजे रामराव महाविद्यालयाचे  प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश एस. पाटील यांचा भावपूर्ण सेवासत्कार तर प्रा. कृष्णा रानगर यांनी प्रभारी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला*
जत, दि. ६ : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित राजे रामराव महाविद्यालय, जत येथील प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश एस. पाटील यांची पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे बदली झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेला सेवासत्कार समारंभ अत्यंत भावनिक, उत्स्फूर्त आणि कृतज्ञतापूर्ण वातावरणात संपन्न झाला. याच कार्यक्रमात संस्थेच्या आदेशानुसार रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. कृष्णा रानगर यांनी प्रभारी प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला. त्यामुळे हा कार्यक्रम सेवेला सलाम करणारा आणि नव्या नेतृत्वाचे स्वागत करणारा असा दुहेरी आनंदाचा सोहळा ठरला.

या कार्यक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे आजीव सेवक श्री कृष्णा बिसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश एस. पाटील यांचा शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहून त्यांना मानवंदना दिली.

यावेळी प्रमुख पाहुणे श्री कृष्णा बिसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले, *"प्राचार्य हे केवळ प्रशासकीय पद नसून ते मूल्याधिष्ठित नेतृत्वाचे केंद्र असते. प्रा. डॉ. सुरेश पाटील यांनी आपल्या कार्यकाळात शिस्त, गुणवत्ता, विद्यार्थीहित आणि संस्थेच्या संस्कारमूल्यांची प्रभावी जपणूक केली. त्यांचे योगदान महाविद्यालयाच्या इतिहासात कायम स्मरणात राहील. त्याचबरोबर नव्याने प्रभारी प्राचार्यपदाची जबाबदारी स्वीकारणारे प्रा. कृष्णा रानगर हेही त्याच समर्पणाने संस्थेची परंपरा अधिक समृद्ध करतील, असा मला विश्वास आहे."*

यावेळी डॉ.शिवाजी कुलाळ, डॉ.अरविंद पवार, प्रा. सिद्राम चव्हाण, माजी प्रभारी प्राचार्य शिवाजीराव बिसले,प्रा. पांडुरंग वाघमोडे, प्रा. कुमार इंगळे, डॉ.ललिता सपताळ, डॉ. मधुमती शिंदे, डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, प्रा.सदाशिव माळी, डॉ.लक्ष्मण भरगंडे, प्रा. लक्ष्मण मासाळ,डॉ. प्रफुल्ल गायकवाड, प्रा.रवींद्र काळे यांच्यासह विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात प्रा. डॉ. सुरेश पाटील यांच्य कार्याचा गौरव करताना सांगितले की, प्राचार्य म्हणून त्यांनी महाविद्यालयात शिस्त, गुणवत्ता, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, संशोधन संस्कृती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि सर्वसमावेशक विकासाला नवी दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने संवाद साधणारे, सहकाऱ्यांना विश्वासाने सोबत घेणारे आणि संस्थेच्या मूल्यांशी निष्ठावंत राहणारे प्रशासक म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.

याच कार्यक्रमात संस्थेच्या आदेशानुसार रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. कृष्णा रानगर यांची प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. सुरेश एस. पाटील यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, *"राजे रामराव महाविद्यालय हे माझ्यासाठी केवळ कार्यस्थळ नव्हते, तर माझे दुसरे कुटुंब होते. येथे मिळालेले सहकार्य, विद्यार्थ्यांचे प्रेम आणि सहकाऱ्यांचा विश्वास हीच माझी खरी कमाई आहे. या महाविद्यालयाशी असलेले माझे ऋण आणि जिव्हाळा आयुष्यभर कायम राहील."*

याच कार्यक्रमात संस्थेच्या आदेशानुसार रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. कृष्णा रानगर यांची प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रभारी प्राचार्यपद स्वीकारल्यानंतर प्रा. कृष्णा रानगर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, *"संस्थेने माझ्यावर टाकलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. प्रा. डॉ. सुरेश पाटील यांनी उभारलेली शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आणि विद्यार्थीहिताची परंपरा अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी मी सर्व सहकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे कार्य करेन."*

कार्यक्रमात प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ. पाटील यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर प्रभारी प्राचार्य म्हणून प्रा. कृष्णा रानगर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय अधिक प्रगती करेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रामदास बनसोडे यांनी सूत्रसंचालन डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी तर आभार प्रा. दिनेश वसावे यांनी मानले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |