पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

👤 अतुल फसाले | 📅 29 June 2026 | 👁 106 Views
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली  श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी मंदिर विकास आराखड्यातून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू असून, मंदिर विकास आराखड्यातून झालेल्या कामांची तसेच करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी करून माहिती घेतली तसेच सद्यस्थितीत सुरू असलेली कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करावीत जेणेकरून दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर जतन व संवर्धन आराखड्यातून सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.‌
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले तदनंतर मंदिर समितीच्या वतीने सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते श्रींची मूर्ती व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |