श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा तयार करण्यासाठी वास्तुविशारद नियुक्त करावा - पालकमंत्री जयकुमार गोरे

👤 अतुल फसाले | 📅 29 June 2026 | 👁 84 Views
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा तयार करण्यासाठी वास्तुविशारद नियुक्त करावा          - पालकमंत्री जयकुमार गोरे
राज्य शासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य आराखड्यासाठी एकूण 3993.90 कोटीचा निधी मंजूर



राज्य शासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य आराखड्यासाठी एकूण 3993.90 कोटीचा निधी मंजूर


सोलापूर, दिनांक 28:- राज्य शासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य आराखड्यासाठी 3 हजार 993 कोटी 90 लाखाचा निधी मंजूर केलेला आहे. यासाठी शासन निर्देशाप्रमाणे आराखडा तयार करण्यासाठी वास्तूविशारद नियुक्त करणे आवश्यक आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूरने पुढील चार दिवसात यासाठीची स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवावी, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल आराखडा पंढरपूर जिल्हास्तरीय समिती बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सह आयुक्त नगरपालिका आशिष लोकरे, वीज वितरण चे अधीक्षक अभियंता सुनील माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, पंढरपूर कार्यकारी अभियंता अमित निमकर,उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे, यांच्या सह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य आराखड्यासाठी वास्तूविशारद नियुक्तीची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया करून या आराखड्याच्या अनुषंगाने संबंधित वास्तुविशारद यांनी जिल्हास्तरीय समिती समोर सादरीकरण करावे. हे सादरीकरण जिल्हास्तरीय समितीने मान्य झाल्यानंतर त्याविषयीचे सादरीकरण मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर केले जाऊन त्यास मंजुरी प्रदान होईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले की, या आराखड्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून शासनाने जिल्हाधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच वास्तुविशारद नियुक्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वेळेत करून घेऊ असे त्यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता अमित निमकर यांनी सर्वप्रथम आराखड्यातील कामाचे नियोजन करण्यासाठी वास्तुविशारद नियुक्त करावा लागेल असे सांगून त्याला शासकीय नियमाप्रमाणे शुल्कही द्यावे लागेल, अशी माहिती दिली.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी आराखड्यातील सर्व घटकांसाठी एकूण 3,993.90 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली असून या निधीचे घटकनिहाय वाटप पुढीलप्रमाणे आहे: वाकऱ्यांसाठी समग्र सोयीसुविधांचा विकास 288.66 कोटी, भाविकांना व्यावसायिक संधी 36.00 कोटी, पुरातन मंदिर व मठांचे जतन व संवर्धन 254.51 कोटी, मंदिर परिसर कॉरिडॉर 510.27 कोटी व एकूण पंढरपूर कॉरिडॉर 1,089.44 कोटी, नगर प्रदक्षिणा मार्ग विकास 162.84 कोटी, नदी घाटांचा विकास व सुशोभीकरण ₹888.38 कोटी, वाहतूक व व्यापारी संकुल 460.40 कोटी, शहर सुशोभीकरण 121.60 कोटी, शहरास जोडणारे पूल व हेलिपॅड 900.00 कोटी, पालखी तळांचा विकास ₹135.11 कोटी, पुनर्वसन खर्च 1,092.12 कोटी, भूमिसंपादन व बाह्य इमारत मोबदला 234.40 कोटी, ज्यामुळे एकूण पुनर्वसन व मोबदला 2,026.52 कोटी इतका आहे.

श्री संत नामदेव महाराज स्मारकासाठी 99 कोटीचा निधी मंजूर -
पंढरपूर येथे 65 एकर जवळील रेल्वेच्या जागेवर श्री संत नामदेव महाराज स्मारक निर्माण करण्यासाठी 99.99 कोटीचा निधी मंजूर असून या अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांना जिल्हास्तरीय समितीने मंजुरी प्रदान केल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
यावेळी या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले वास्तूविशारद योगेश राठी यांनी श्री संत नामदेव महाराज समारक अंतर्गत अंतर्भूत केलेल्या कामांची माहिती पीपीटी द्वारा बैठकीत सांगितली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |