घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे - जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

👤 अतुल फसाले | 📅 29 June 2026 | 👁 174 Views
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे           - जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर त्यांचे बीएलए नियुक्त करावेत
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यातही मतदार यादींच्या अचूकतेसाठी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) दिनांक 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक घरी भेट देऊन घरातील प्रत्येक मतदारांची माहिती घेणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार प्रगणन अर्ज भरण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत राजकीय पक्षाच्या बैठकीत जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल लक्ष्मण कसेकर, निवडणूक तहसीलदार श्री. विभुते, शेख ईलियास (AIMIM), अजित प्रकाश पात्रे (N.C.P.S.P), प्रकाश अवस्थी (शिवसेना), सातलिंग शटगार (काँग्रेस (आय), गायकवाड एस.एम. (काँग्रेस (आय), लक्ष्मण बनसोडे (काँग्रेस (आय), मिलिंद शिंगशेट्टी (मनसे), अहमद कासीम मोमीन (NCP), शंकर पाटील, (NCP), नरसिंग एस. म्हेत्रे, (C.P.I.M.), अंबादास पी. बिंगी, (C.P.I.M.), विल्यम कि. ससाने, (C.P.I.M.), वसीम सलीम मुल्ला, प्रशांत गोणेवार, चेतन (भाऊ) नरोटे, भिमाशंकर टेकाळे, सौ. रोहिणी तडवळकर अध्यक्ष (भाजपा), उदयशंकर ए. चाकोते, तिरुपती रा. परकीपंडला यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात एकूण 39 लाख 41 हजार 95 मतदार आहेत. यापैकी ग्रामीण भागातील 90 टक्के तर शहरी भागातील 75 टक्के मतदारांचे मॅपिंग करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील तीन हजार 723 मतदान केंद्रावर बी एल ओ ची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बी एल ओ मार्फत जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांना प्रगणन अर्ज देऊन भरून घेतले जाणार असून त्यामध्ये मॅप, अनमॅप आणि अनालोमी ची माहिती विचारली जाणार आहे व ती अचूक माहिती व त्याचे पुरावे नागरिकांनी द्यावेत, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी विधानसभा निहाय प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी दिला पाहिजे. काँग्रेस 610, भाजपा 19957, शिवसेना 1622 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 21 व इतर पक्षांनी 22 बी एल ए ची नियुक्ती केलेली आहे. तरी सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आपले प्रतिनिधी नियुक्त करून प्रशासनाला सहकार्य करावे अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.
एस.आय.आर. कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार निवडणूक यादीसंदर्भातील विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमानुसार पात्रता दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी निश्चित करण्यात आली असून तयारी, प्रशिक्षण व छपाईचे काम २० जून ते २९ जून दरम्यान पार पडणार आहे. बी.एल.ओ. यांच्याकडून घरोघरी भेटीचे काम ३० जून ते २९ जुलैपर्यंत होईल व मतदान केंद्रांचे तर्कशुद्धीकरण २९ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येईल. मसुदा मतदार यादीचे प्रकाशन ५ ऑगस्ट रोजी होईल व दावा-हरकती दाखल करण्याचा कालावधी ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर असा असेल. दावा-हरकतींची नोटीस व निकाली प्रक्रिया ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबरपर्यंत चालेल. अंतिम मतदार यादीचे प्रकाशन ७ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन
यांनी दिली.

यावेळी राजकीय पक्ष प्रतिनिधी यांनी बीएलओ यांनी फोन उचलावेत, बारा पुराव्याची प्रसिद्धी करावी,
एकाच कुटुंबातील मतदाराचे मतदान एकाच मतदान केंद्रावर येण्याबाबतची कार्यवाही प्रशासनाने करावी, मतदाराची दुबार नोंदणी होणार नाही याची दक्षता घ्यावी या मागण्या बरोबरच विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात प्रशासनाला राजकीय पक्षाकडून सहकार्य करण्यात येईल असेही सांगण्यात आले.


*कागदपत्रांची सूचक यादी_
१. केंद्र शासन/राज्य शासन/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) यांचे नियमित कर्मचारी अथवा निवृत्तीवेतनधारकांना निर्गमित करण्यात आलेले कोणतेही ओळखपत्र/निवृत्तीवेतन प्रदान आदेश
२. शासन/स्थानिक प्राधिकरण/बँका/टपाल विभाग/LIC/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) यांच्यामार्फत भारतात निर्गमित करण्यात आलेले दिनांक ०१.०७.१९८७ पूर्वीचे कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र/दस्तऐवज
३. सक्षम प्राधिकरणामार्फत निर्गमित केलेले जन्म प्रमाणपत्र
४. पारपत्र
५. मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठ यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेले मॅट्रिक्युलेशन/शैक्षणिक प्रमाणपत्र
६. सक्षम राज्य प्राधिकरणामार्फत निर्गमित करण्यात आलेले कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र
७. वनहक्क प्रमाणपत्र
८. सक्षम प्राधिकरणामार्फत निर्गमित करण्यात आलेले इतर मागासवर्गीय/अनुसूचित जाति/अनुसूचित जमाती अथवा इतर जात प्रमाणपत्र
९. राष्ट्रीय नागरिक नोंदवही (ज्या ठिकाणी लागू असेल तेथे)
१०. शासकीय अधिकाऱ्यांमार्फत कोणत्याही सांविधानिक/प्रशासकीय नियमानुसार जतन केलेली कौटुंबिक नोंदवही
११. शासनामार्फत निर्गमित केलेले जमीन/घर वाटप प्रमाणपत्र
१२. आधार करिता, आयोगाचे पत्र क्र. २३/२०२५-ERS/Vol. II दिनांक ०९.०९.२०२५ (परिशिष्ट-II) अन्वये निर्गमित केलेले निर्देश लागू राहतील.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |