सोलापूर विभागातील पोस्ट ऑफिस योजनांमध्ये मोठी गुंतवणूक आरडी आणि टीडी खात्यांच्या संख्येत विक्रमी वाढ

👤 अतुल फसाले | 📅 29 June 2026 | 👁 166 Views
सोलापूर विभागातील पोस्ट ऑफिस योजनांमध्ये मोठी गुंतवणूक आरडी आणि टीडी खात्यांच्या संख्येत विक्रमी वाढ

सुरक्षित आणि हमीभाव परतावा देणारी गुंतवणूक म्हणून आजही सर्वसामान्य नागरिक पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना पहिली पसंती देत असल्याचे चित्र समोर आले आहे. उपलब्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सोलापूर विभागांतर्गत आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आवर्ती ठेव आणि मुदत ठेव खात्यांच्या संख्येत लक्षणीय आणि विक्रमी वाढ झाली आहे. नागरिक मोठ्या प्रमाणावर पोस्टाच्या योजनांकडे आकर्षित होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सोलापूर विभागात एकूण ३९,२५४ आरडी खाती उघडण्यात आली होती. या संख्येत पुढील आर्थिक वर्षात (२०२५-२६) मोठी वाढ होऊन हा आकडा थेट ४९,८६३ वर पोहोचला आहे. मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांमध्ये दरमहा ठराविक रक्कम बचत करण्याची क्रेझ वाढल्याचे हे लक्षण आहे.
१ वर्षाच्या मुदत ठेव योजनेला नागरिकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. २०२४-२५ मध्ये या योजनेची १४,३६० खाती होती, तर २०२५-२६ मध्ये यामध्ये जवळपास दुपटीने वाढ होऊन हा आकडा २५,०८१ वर गेला आहे.
सोलापूर विभागातील गुंतवणुकीची आकडेवारी
| योजना | आर्थिक वर्ष २०२४-२५ | आर्थिक वर्ष २०२५-२६
आवर्ती ठेव | ३९,२५४ | ४९,८६३ |
१ वर्षाची मुदत ठेव | १४,३६० | २५,०८१
२ वर्षांची मुदत ठेव| २,०७९ | ५,३९१ |
३ वर्षांची मुदत ठेव | ६५८ | १,३३१ |
५ वर्षांची मुदत ठेव | ३,९०८ | ७,०२० |
बँकांपेक्षा सुरक्षितता आणि चांगला परतावा
शेअर बाजारातील चढ-उतार आणि इतर खाजगी वित्तीय संस्थांमधील जोखीम पाहता, सोलापूर जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या पारंपरिक योजनांवर अधिक विश्वास ठेवत असल्याचे या आकडेवारीवरून सिद्ध होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |