अपघातग्रस्त कुटुंबांना मराठा महासंघाचा आधार; भिगवण शाखेकडून ₹५५ हजारांची मदत

👤 अतुल सोनकांबळे इंदापूर | 📅 28 June 2026 | 👁 235 Views
अपघातग्रस्त कुटुंबांना मराठा महासंघाचा आधार; भिगवण शाखेकडून ₹५५ हजारांची मदत
सरडेवाडीतील अपघातग्रस्तांच्या कुटुंबांना दिलासा; दानशूर नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन मदतीचा तपशील : कै. रामचंद्र जमदाडे यांच्या कुटुंबीयांना ₹३० हजारांची मदत जखमी बिपीन मोरे व संतोष माने यांना मिळून ₹२५ हजारांची आर्थिक मदत
संकटाच्या काळात समाजाने समाजासाठी धावून जाण्याचा आदर्श अखिल भारतीय मराठा महासंघ, भिगवण शाखेने घालून दिला आहे. सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील युवक मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटी (जि. बीड) येथे गेले असता, परतीच्या प्रवासात झालेल्या भीषण अपघातात रामचंद्र जमदाडे यांचा मृत्यू झाला, तर बिपीन मोरे व संतोष माने हे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या भिगवण शाखेने लोकवर्गणीतून जमा केलेला ₹५५ हजारांचा मदतनिधी संबंधित कुटुंबांना सुपूर्द केला.
मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने निधी उभारून सामाजिक बांधिलकी जपल्याचे यानिमित्ताने दिसून आले. कै. रामचंद्र जमदाडे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तसेच जखमी बिपीन मोरे हे मोलमजुरीवर उदरनिर्वाह करत असल्याने त्यांच्यासमोरही आर्थिक संकट उभे आहे.
यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी या कुटुंबांना यथाशक्ती आर्थिक मदतीचा हात द्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या भिगवण शाखेच्या वतीने करण्यात आले. दुःखाच्या प्रसंगी आर्थिक मदतीसोबत मानसिक आधारही तितकाच महत्त्वाचा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |