महिला सक्षमीकरण, शेतमालाला बाजारपेठ, युवा प्रशिक्षणास प्राधान्य देऊन जिल्हा वार्षिक योजनेचे प्रस्ताव करावेत

👤 संतोष एडके तासगाव | 📅 28 June 2026 | 👁 312 Views
महिला सक्षमीकरण, शेतमालाला बाजारपेठ, युवा प्रशिक्षणास  प्राधान्य देऊन जिल्हा वार्षिक योजनेचे प्रस्ताव करावेत
सांगली जिल्हा वार्षिक योजनेतून महिलांचे सक्षमीकरण, शेतमालाला बाजारपेठ व युवकांना प्रशिक्षण व रोजगार उपलब्धी हे लक्ष्य ठेवून संबंधित विभागांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कामे प्रस्तावित करावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या.

जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महापालिका आयुक्त संजिता महापात्र, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी उदय पवार आदि उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात महिलांचे विशेषत: एकल महिलांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि युवा पिढीचे कौशल्य विकास व रोजगार उपलब्धी हे तीन घटक केंद्रस्थानी ठेवून जिल्हा वार्षिक योजनेतील कामे संबंधित विभागांनी प्रस्तावित करावीत. महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी तसेच युवा पिढीला उद्योग, सेवा व कौशल्याधारित क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास, प्रशिक्षण कार्यक्रम आणि रोजगाराभिमुख उपक्रम आखावेत, असे त्यांनी सूचित केले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)) चा आढावा घेत चालू आर्थिक वर्षातील प्रस्तावांच्या मंजुरीबाबत गतीने कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्र, विविध कामांना युडीआय यासह जिल्ह्यातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रस्ताव, विभागनिहाय उद्दिष्टपूर्ती आणि योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शेतमालाला अधिक चांगली आणि व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली. मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठेशी थेट जोडणी आणि शेतकरी उत्पादक संस्थांना (FPO) बळकटी देण्यासाठी आवश्यक बाबींवर भर देण्यात आला.

दरम्यान या बैठकीपूर्वी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत विविध कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. यामध्ये प्रामुख्याने पावसाळापूर्व कामांची पूर्तता तसेच मालमत्ता कर आकारणीच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. त्यावेळी महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी याबाबतची माहिती सादर केली. या बैठकीस महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील बांधकाम अभियंता पृथ्वीराज चव्हाण आदि उपस्थित होते.

यावेळी जागतिक बॅंकेकडील निधीतून प्रस्तावित कामे, सद्यस्थिती, जिल्हा वार्षिक योजनेतून रस्ते कामे, महापूर पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आदि बाबींचा आढावा घेण्यात आला
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |