अमृत' संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत 'ड्रोन पायलट' प्रशिक्षण

👤 राहुल टिबे सांगली | 📅 23 June 2026 | 👁 197 Views
अमृत' संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत 'ड्रोन पायलट' प्रशिक्षण

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना रोजगार आणि कौशल्य विकासाच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी) या स्वायत्त संस्थेतर्फे 'अमृत ड्रोन मिशन' हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांना मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार असून, ग्रामीण भागातील तरुण-तरुणींसाठी ही एक मोठी संधी ठरणार असल्याचे अमृत संस्थेतर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
सध्याच्या काळात शेती, सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन, उद्योग, चित्रीकरण, लॉजिस्टिक्स आणि सुरक्षा क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित ड्रोन पायलटची मागणी दिवसेंदिवस वाढत असून या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर 'अमृत' संस्था युवकांना या आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे या मोफत प्रशिक्षणामध्ये ड्रोन हाताळणी, सुरक्षा नियम, डिजिटल मॅपिंग, कृषी क्षेत्रातील वापर, हवाई सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात येणार आहे. विशेषतः ग्रामीण युवकांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांना आत्मनिर्भर आणि रोजगारक्षम बनण्यावर भर दिला जात आहे. अधिक माहितीसाठी https://mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळ पहावे किंवा महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत), होमगार्ड ऑफिस शेजारी, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर, राजवाडा, सांगली, मनोज मारुती मिरासदार (मोबाईल क्रमांक: 9112228766) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |