इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून ५४ वर्षीय इसमाचा लोखंडी रॉडने खून

👤 अतुल सोनकांबळे इंदापूर | 📅 23 June 2026 | 👁 196 Views
इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून ५४ वर्षीय इसमाचा लोखंडी रॉडने खून
पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ तपासाची चक्रे फिरवीत दोन्ही आरोपींना घेतले ताब्यात

इंदापूर - तालुक्यातील तरंगवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय इसमाचा लोखंडी रॉडने मारहाण करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार (ता.20) दुपारी घडली.

या प्रकरणी दोघांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून छगन पांडुरंग भिसे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तर आरोपी धुळदेव उर्फ देवा तुकाराम माने (रा. खुळेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि अशोक भानुदास टकले (रा. तरंगवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत अमोल छगन भिसे (रा.तरंगवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 20 जून रोजी दुपारच्या सुमारास तरंगवाडी गावच्या हद्दीतील वाघजाई चौक परिसरातील रस्त्यावर ही घटना घडली असून कथित अनैतिक संबंधांच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यातून दोन्ही आरोपींनी संगनमत करून लोखंडी रॉडने छगन भिसे यांच्या डोक्यावर गंभीर वार केले, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळाला भेट देत तपासाबाबत सूचना केल्या त्यानरूप पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ तपासाची चक्रे फिरवीत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे करत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |