अंगणवाडी व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत मदत करणार - नगराध्यक्ष संदेश पारकर

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 June 2026 | 👁 132 Views
अंगणवाडी व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत मदत करणार - नगराध्यक्ष संदेश पारकर
अंगणवाडी सेविका शहरातील लहान मुलांवर चांगले संस्कार घडवतात - उपनगराध्यक्ष सुशांत नाईक* महिला व बाल विकास विभाग यांच्या महिला मेळाव्यास नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची उपस्थिती
कणकवली : अंगणवाडी व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतीकडून लागेल ती मदत करण्यात येईल. तसेच भविष्यात शहरात आणखी अंगणवाड्या वाढवण्यासाठी मागणीनुसार नगरपंचायत योग्य ती मदत करेल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बाल विकास विभाग तसेच अंगणवाडीच्या वतीने कणकवली येथे लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उद्घाटन नगराध्यक्ष संदेश पारकर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले. प्रथमता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्ष संदेश पारकर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
अंगणवाडी सेविका शहरातील लहान मुलांवर चांगले संस्कार घडवतात. शहरात फक्त सहा अंगणवाडीशाळा आहेत. यावेळी अजून अंगणवाडीशाळा वाढवण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. अंगणवाडी सेविका या गरोदर महिलांचे संगोपन करण्यापासून ते लहान मुलांच्या वाढी पर्यंत या सेविका काम करतात. खरं म्हणजे या सेविका लहान मुलांच्या दुसऱ्या आई प्रमाणे त्यांचे पालन, पोषण व संगोपन करण्याचे काम करतात असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केले. संगोपनातून लहान मुलांवर संस्कार घडवण्याचे मोलाचे काम या अंगणवाडी सेविका करतात. यामुळे त्यांच्या मेहनतीच फळ त्यांना देण गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने त्यांचे वेतन वाढ करणे गरजेचे आहे अशी मागणी यावेळी करण्यात अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, नगरसेविका जाई मुरकर, दीपिका जाधव, तेजस राणे, आरोग्य सहाय्य प्रशांत बुचडे, यांच्यासह कणकवली नगरपंचायतचे नगरसेवक, विद्यार्थी मुख्यअंगणवाडी सेविका,शहरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात अंगणवाडीतील चिमुकल्यांनी नृत्य, गाणी आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला दिनाचे औचित्य साधत लहान मुलांमधील कलागुणांना वाव देण्याचा तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |