तहसीलच्या दारातच न्याय मागणाऱ्यांना दमदाटी; रस्त्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला बेदम मारहाण

👤 अतुल सोनकांबळे | 📅 20 June 2026 | 👁 178 Views
तहसीलच्या दारातच न्याय मागणाऱ्यांना दमदाटी; रस्त्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला बेदम मारहाण
इकडे परत यायचं नाही’ म्हणत अमोल राऊतची दहशत; इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
शेतजमिनीकडे जाणारा रस्ता खुला करावा, या साध्या मागणीसाठी तहसील कार्यालयात गेलेल्या शेतकऱ्याला न्यायाऐवजी लाथाबुक्क्यांचेच दान मिळाले. तहसीलदारांना स्मरणपत्र देऊन परतणाऱ्या नागरिकांना तहसीलच्या आवारातच अडवून अमोल राऊत याने शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
आंबिकानगर येथील अमोल प्रभाकर कारंडे, 38 हे शेतकरी मित्र अविनाश नवगिरे, संतोष गोरे व राजेश झगडे यांच्यासह गट नं. 332/1/3/1 मधील वहिवाटीचा रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी तहसील कार्यालयात गेले होते. निवेदन देऊन बाहेर पडताच अमोल उत्तम राऊत याने त्यांना गाठले.

“तू काहीही कर, तुला रस्ता मिळणारच नाही. परत इथे दिसलास तर याद राख,” अशी दमदाटी करत राऊतने कारंडे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भेदरलेल्या इतर तिघांनाही ‘जिवे मारू’ अशी धमकी दिली.


तहसील कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणी, दिवसा ढवळ्या झालेल्या या घटनेने नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “दाद मागायला आलेल्यांनाच जर मारहाण होत असेल तर सामान्यांनी जायचे कुठे?” असा सवाल उपस्थित होत आहे.

याप्रकरणी अमोल कारंडे यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिसांनी अमोल राऊतविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार सलमान खान अधिक तपास करत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |