डाळिंबाच्या ‘कॅलिफोर्निया’ची यशोगाथा आता इयत्ता सहावीच्या भूगोल पुस्तकात; राज्यभर गाजले अजनाळे

👤 अतुल फसाले | 📅 19 June 2026 | 👁 173 Views
डाळिंबाच्या ‘कॅलिफोर्निया’ची यशोगाथा आता इयत्ता सहावीच्या भूगोल पुस्तकात; राज्यभर गाजले अजनाळे
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अजनाळे गावाने सामूहिक जलव्यवस्थापन, पाणलोट विकास आणि डाळिंब शेतीच्या बळावर घडविलेली विकासाची यशोगाथा आता राज्यातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इयत्ता सहावीच्या भूगोल विषयाच्या पुस्तकात अजनाळे गावाचा विशेष अभ्यासक्रम म्हणून समावेश करण्यात आला असून, त्यामुळे गावाच्या कार्याची राज्यभर दखल घेतली जात आहे.

अल्प पर्जन्यमान, तीव्र दुष्काळ आणि पाण्याची टंचाई या समस्यांशी वर्षानुवर्षे सामना करणाऱ्या अजनाळेकरांनी हार न मानता जलसंधारणाचा मार्ग स्वीकारला. १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर गावात विविध विकासकामांना गती देण्यात आली. बंधारे, बॅरेज, शेततळी आणि पाण्याचे योग्य नियोजन यामुळे गावात जलक्रांती घडली. त्यातून शेती उत्पादनात वाढ झाली आणि डाळिंब शेतीमुळे अजनाळेची ओळख राज्याच्या सीमा ओलांडून देशभर पोहोचली.

आज अजनाळे हे सांगोला तालुक्याचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी जलव्यवस्थापन आणि लोकसहभागाचा आदर्श ठरले आहे. गावातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत डाळिंब उत्पादनात उल्लेखनीय प्रगती साधली असून, त्यामुळे या भागाला ‘डाळिंबाचे कॅलिफोर्निया’ अशी ओळख मिळाली आहे.

पाठ्यपुस्तकात स्थान मिळाल्याने अजनाळे गावाच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाला नवे अधिष्ठान मिळाले आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना गावाच्या विकासाचा अभ्यास करता येणार असून, जलसंधारण आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर अशक्य वाटणारी उद्दिष्टेही साध्य करता येतात, याचा प्रेरणादायी संदेश या माध्यमातून मिळणार आहे.

गावाच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, शेतकरी आणि जलसंपदा संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, अजनाळेच्या या यशामुळे संपूर्ण सांगोला तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
बँक ऑफ महाराष्ट्रची ३ कोटींची फसवणूक; ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; इस्लामपूर येथील बनावट सातबारा प्रकरण | अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप उजळतोय अकराव्या वर्षात ! ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी गोड करणार | भडगाव तहसीलदार कारवाईसाठी जात असताना अपघातात जखमी | रामटेक गडमंदिरात पारंपरिक काकड आरती महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ | अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता, अपहृत मुली, महिला व पुरुषांचा लावला यशस्वी शोध | रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल |