विधानपरिषद मतदानासाठी आनंदराव पवार बापूंच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व नगरसेवक मतदानास रवाना

👤 राहुल टिबे सांगली | 📅 18 June 2026 | 👁 55 Views
विधानपरिषद  मतदानासाठी आनंदराव पवार बापूंच्या नेतृत्वाखाली महायुतीचे  सर्व नगरसेवक मतदानास रवाना
विधानपरिषद मतदानासाठी आनंदराव पवार बापूंच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व नगरसेवक मतदानास रवाना
आज ईश्वरपूर येथे उरुण ईश्वरपूर नगरपरिषद, आष्टा नगरपालिका, आणि शिराळा नगरपंचायत येथील शिवसेना महायुतीचे सर्व नगरसेवक शिवसेना सांगली जिल्हा संपर्क कार्यालय मार्केट यार्ड ईश्वरपूर येथून शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानपरिषद निवडणूक मतदानासाठी रवाना झाले. तत्पूर्वी आनंदराव पवार बापूंनी सर्व नगरसेवक मतदार बंधू भगिनींचे स्वागत केले तसेच सर्व मतदारांना भगवे फेटे नेसवण्यात आले. त्यानंतर कार्यालय बाहेर सर्वांनी एकत्र येऊन महायुतीचा विजय असो अशा घोषणा दिल्या आणि त्यानंतर तहसील कार्यालय येथे मतदानासाठी रवाना झाले. यावेळी शिराळाचे आमदार सत्यजित देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा बँक संचालक राहुल महाडिक, प्रसाद लाड आदी उपस्थित होते

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
विधानपरिषद मतदानासाठी आनंदराव पवार बापूंच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व नगरसेवक मतदानास रवाना | सांगली जिल्ह्यात 'एल निनो'चे संकट; अनधिकृत पाणी उपशावर होणार कडक कारवाई - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष | आटपाडीत १० लाखांत प्रकरण दाबल्याची चर्चा; मोठ्या जनावरांच्या मटणप्रकरणामुळे खळबळ | दुःखाच्या काळात तिगाव गावाची माणुसकी; सानप कुटुंबाला ₹1 लाख 83 हजारांची मदतीचा हात | आटपाडीतील हॉटेल व्यवसायात स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष? | पुण्यात जमीन व्यवसायिकांचे ऐतिहासिक एकत्रीकरण; 150 हून अधिक व्यावसायिकांच्या उपस्थितीत PLRA ची स्थापना | ईश्वरपूर शहरातील हॉटेल चालकांकडून अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर | ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत : बसवराज पाटील | तासगावात 'कॅफे संस्कृती'चा विळखा; अल्पवयीन मुला-मुलींच्या वाढत्या राबत्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण. | आटपाडीतील नामांकित हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाची धाड? मग सत्य लपवले कोणासाठी? |