नागाव कवठे येथील मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीचा तासगाव पोलिसांकडून पर्दाफाश ​फरार तिसऱ्या आरोपीला बेड्या :

👤 संतोष एडके तासगाव | 📅 12 June 2026 | 👁 432 Views
नागाव कवठे येथील मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीचा तासगाव पोलिसांकडून पर्दाफाश ​फरार तिसऱ्या आरोपीला बेड्या :
तासगाव तालुक्यातील नागाव कवठे येथील नागनाथ मंदिर आणि लक्ष्मीमाता मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीच्या तपासात तासगाव पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, तर आज या टोळीतील फरार असलेल्या तिसऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

​नेमकी घटना

दिनांक १८ मे २०२६ रोजी रात्री ८:३० ते १९ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी नागाव कवठे गावातील नागनाथ मंदिर आणि लक्ष्मीमाता मंदिरात प्रवेश केला होता। चोरट्यांनी मंदिरातील देवाच्या अंगावरील चांदीचे दागिने आणि सोन्याची बोरमाळ अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती। याप्रकरणी सुरेश भिमराव पाटील राहणार नागाव - कवठे एकंद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता।

​पोलीस पथकाची धडाकेबाज कामगिरी:

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले होते। पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासचक्रे फिरवून यापूर्वीच दोन आरोपींना अटक केली होती। तपासादरम्यान आज फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीलाही पोलिसांनी शोधून काढले। या टोळीने चोरी केलेला २ लाख ९२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे।

​कारवाईत सहभागी पोलीस पथक:

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक आरती बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (जत विभाग) सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल टकले, सपोनि दीपक पाटील आणि स्थानिक पोलीस पथकाने केली। या कारवाईत सायबर पोलीस ठाणे आणि उमदी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांचेही महत्त्वाचे योगदान राहिले आहे

​अटकेतील आरोपी:
​यापूर्वी अटक केलेले आरोपी:
१. प्रशांत हिम्मत शिंदे (वय ३०, रा. येळावी, ता. तासगाव)
२. अरविंद राजू चव्हाण (वय २१, रा. सांडेवाडी, ता. पलूस)


​आज अटक केलेला आरोपी:
3) अरविंद श्रीशैल चव्हाण (वय २८, रा. बेळोंडगी, ता. जत)

​या प्रकरणाचा पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
बँक ऑफ महाराष्ट्रची ३ कोटींची फसवणूक; ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; इस्लामपूर येथील बनावट सातबारा प्रकरण | अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप उजळतोय अकराव्या वर्षात ! ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी गोड करणार | भडगाव तहसीलदार कारवाईसाठी जात असताना अपघातात जखमी | रामटेक गडमंदिरात पारंपरिक काकड आरती महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ | अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता, अपहृत मुली, महिला व पुरुषांचा लावला यशस्वी शोध | रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल |