पांगरीची सुकन्या अर्पिता दडस हिचा मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार!

👤 आकाश दडस सातारा | 📅 09 June 2026 | 👁 365 Views
पांगरीची सुकन्या अर्पिता दडस हिचा मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार!
धैर्याने आणि कष्टाने मिळवले यश; पांगरी गावासह माण तालुक्याचा गौरव
माण तालुक्यातील पांगरी गावची सुकन्या अर्पिता सुरेखा शांताराम दडस हिची मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई पदी निवड झाल्याबद्दल पांगरी ग्रामपंचायत आणि समस्त दडस परिवार व ग्रामस्थांच्या वतीने तिचा जाहीर सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. ग्रामीण भागातील मुलीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पांगरी येथील ग्रामपंचायत प्रांगणात शुक्रवार, दिनांक ५ जून २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंचायत समिती सदस्य ,अर्जुन काळे , स्वराज्य अकॅडमीचे संस्थापक सुनील काटकर, सरपंच अजित दडस, पोलीस खाडे सर,किसन विरकर यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, दडस परिवार व समस्त पांगरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना सुनील काटकर बोलताना म्हणाले "ग्रामीण भागातील मुली आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. अर्पिताने पोलीस दलात भरती होऊन गावाची मान अभिमानाने उंच केली आहे. तिने घेतलेले कष्ट इतर तरुण-तरुणींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील."अर्पिताने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय आणि 'स्वराज अकॅडमी, दहीवडी' च्या मार्गदर्शकांना दिले आहे. अत्यंत साध्या आणि शेतकरी कुटुंबातील असलेल्या अर्पिताच्या या यशामुळे संपूर्ण पांगरी गावात आनंदाचे वातावरण असून गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमाचे संयोजन आणि आभार प्रदर्शन समस्त दडस परिवार व पांगरी ग्रामस्थांनी केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |