पुढील तारीख लवकरच कळविली जाणार असल्याचे प्रशासनाची माहिती
कणकवली नगरपंचायतीतर्फे इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आयोजित करण्यात आलेला सत्कार समारंभ आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. अशी माहिती नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी गुरुवार दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल. सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आचारसंहिता लागू झाल्याने सदर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
कार्यक्रमाची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही नगरपंचायत प्रशासनाने सांगितले आहे.