'शब्दांच्या पलीकडले...!'आता ब्रेल लिपीमध्ये अंधशाळा शिक्षिका प्रतिभा सेनगुप्ता करणार ब्रेल लिपी मध्ये भाषांतर

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 22 May 2026 | 👁 218 Views
'शब्दांच्या पलीकडले...!'आता ब्रेल लिपीमध्ये अंधशाळा शिक्षिका  प्रतिभा  सेनगुप्ता करणार ब्रेल लिपी मध्ये भाषांतर
सुरेश शामराव ठाकूर यांचे 'शब्दांच्या पलीकडले' हे पुस्तक आता ब्रेल लिपीमध्ये येत आहे.पुणे येथे अंधशाळेत गेली 28 वर्षे शिक्षिका म्हणून सेवा केलेल्या आदर्श शिक्षिका प्रतिभा प्रणव सेनगुप्ता याचे ब्रेल लिपी मध्ये भाषांतर करणार आहेत. आजच त्यांनी सुरेश ठाकूर यांच्याकडून त्या भाषांतराची अधिकृत परवानगी घेतली. सेन गुप्ता म्हणाल्या 'हे पुस्तक मराठीची ओढ असणाऱ्या प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी असले तरी माझ्या अंधबांधवांपर्यंत ते जाऊ शकत नाही. कारण ते अंध बांधव शब्द प्रकाशाच्या पलीकडची असतात. सुरेश ठाकूर यांचे हे पुस्तक मला स्वतःला फार भावले असून त्यातील 111 शब्द महाराष्ट्रातील अंध मुलांपर्यंत जाऊन पोहोचावेत. त्यांच्यापर्यंत हा शब्द प्रकाश पोहोचवावा असा मनात विचार आल्यामुळे मी सुरेश ठाकूर यांच्याकडे ब्रेल लिपीतील भाषांतराची परवानगी मागितलेली होती. लवकरच त्याची प्रत मी सुरेश ठाकूर यांना नमुना प्रत म्हणून पाठवेन.त्या पुस्तकातील एका पानावर देव नागरी आणि दुसऱ्या पानावर ब्रेल लिपी अशी त्याची रचना असेल.प्रतिभा सेनगुप्ता या मंडणगड येथे कोकणातील एकमेव असे अंध विद्यालय चालवत असून शब्दांच्या पलीकडले या पुस्तकातील 111 शब्दांचे कुळ आणि मूळ अंध बांधवांपर्यंत पर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्न करणार आहेत. सदर पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांचे शुभाशीर्वाद लाभले असून त्यांनीही या सेवाभावी कार्याबद्दल प्रतिभा सेनगुप्ता यांचे अभिनंदन केलेले आहे.या पुस्तकाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली असून सध्या या पुस्तकाचे अभिवाचन रश्मी आंगणे , कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युट्युब चॅनेल वरून करीत आहेत.त्यालाही भरघोस प्रसिद्ध मिळत आहे. सुरेश ठाकूर यांचे हे पुस्तक ब्रेल लिपीत येत असल्यामुळे त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे*
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |