संगमनेर तालुक्यातील तळेगाव प्रादेशिक जीवनधारा पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असणाऱ्या २१ गावांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. वडगाव पान येथील साठवण तलावाची पाहणी करून ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा योजनेच्या मशीनचे बटन सुरू करण्यात आले आणि २१ गावांची तहान भागवणारा जलप्रवाह पुन्हा सुरू झाला.
दीर्घ प्रतीक्षेनंतर खळखळत वाहणारे पाणी पाहून ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता. अनेक ग्रामस्थांनी या क्षणाला “जीवनदायी पर्वाची सुरुवात” अशी भावना व्यक्त केली. यावेळी ग्रामस्थांच्या शुभहस्ते जलपूजन करून जीवनदायी जलसंपत्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ आणि पुरेसे पाणी पोहोचवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून लोकसेवेचे कर्तव्य असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आदरणीय जलसंपदा मंत्री नामदार Radhakrishna Vikhe Patil यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याला पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी आणि प्रत्येक गाव सुजलाम-सुफलाम करण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
तळेगाव प्रादेशिक जीवनधारा पाणीपुरवठा योजनेमुळे २१ गावांतील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले आहे