अवकाळी पावसाचा फटका : वीज कोसळून १८ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू; मेंढपाळाचे साडेपाच लाखांचे नुकसान

👤 आकाश दडस सातारा | 📅 14 May 2026 | 👁 142 Views
अवकाळी पावसाचा फटका : वीज कोसळून १८ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू; मेंढपाळाचे साडेपाच लाखांचे नुकसान
माण तालुक्यातील पळसावडे येथील मेंढपाळ हनुमंत बापू मासाळ हे आपल्या शेळ्या-मेंढ्यांसह सातारा तालुक्यातील कोंडवे परिसरात अनेक महिन्यांपासून वास्तव्य करून चराई करत होते. दरम्यान, बुधवार दि. १३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसास सुरुवात झाली. याचवेळी जोरदार वादळी वाऱ्यासह वीज कोसळून त्यांच्या १८ शेळ्या-मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना कोंडवे ता. सातारा येथील गट नंबर ७२ मध्ये घडली असून, सदर शेत रमेश दत्तू चोरगे यांच्या मालकीचे आहे. अवकाळी पावसात अचानक वीज पडल्याने शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे मेंढपाळ हनुमंत मासाळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, मृत जनावरांची अंदाजे किंमत ५ लाख ४० हजार रुपये इतकी असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी कोंडवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचांसमक्ष पाहणी केली. त्यानंतर नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी तसेच पंच म्हणून जमीर शेख, आकाश गुजर, संजय निंबाळकर व मानाजी निंबाळकर उपस्थित होते. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे हनुमंत बापू मासाळ यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |