अंबड मध्ये धान्याच्या काळ्याबाजारीवर मोठी कारवाई: काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 6.37 लाखांचा शासकीय/शालेय पोषण आहाराचा धान्यसाठा जप्त; एकावर गुन्हा दाखल

👤 अनिल भालेकर | 📅 19 July 2026 | 👁 138 Views
अंबड मध्ये धान्याच्या काळ्याबाजारीवर मोठी कारवाई: काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 6.37 लाखांचा शासकीय/शालेय पोषण आहाराचा धान्यसाठा जप्त; एकावर गुन्हा दाखल
शासकीय योजने अंतर्गत शालेय पोषण आहारासाठी उपयोगात येणारे गहू व तांदळाचा साठा, काळ्या बाजारात बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने पोलिस व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करत जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 6 लाख 37 हजार 418 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गोदाम मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
याबाबत माहिती अशी की, दि. 16 जुलै 2026 रोजी सायंकाळी पुरवठा व महसूल विभागाला गोपनीय माहिती मिळाली की, चांगले नगर, अंबड येथील एका खाजगी पत्र्याच्या गोदामात बेकायदेशीररित्या धान्याचा साठा करून ठेवला आहे. या माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पथकाने पोलीस कर्मचाऱ्यांसह रात्री 7.45 वाजेच्या सुमारास सदर गोदामावर छापा टाकला.
गोदामाच्या दरवाजाला कुलूप असल्याने आणि मालक शेख नसीर अब्बास बागवान (रा. अंबड) यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने, पंचासमक्ष गोदामाचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्यात आला.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
तपासणी दरम्यान गोदामात कोणताही वैध परवाना किंवा नोंद नसलेला खालील मुद्देमाल मिळून आला यामध्ये गहू 189 गोण्या (एकूण 94.50 क्विंटल) – किंमत अंदाजे रु. 2 लाख 97 हजार 702 तर तांदूळ 152 गोण्या (एकूण 76 क्विंटल) – किंमत अंदाजे रु. 3 लाख 33 हजार 716 इतर साहित्य मध्ये शासकीय धान्य वितरणासाठी वापरली जाणारी 80 रिकामी पोती आणि 6 हजार 500रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण रु. 6 लाख 37 हजार 418 मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास याप्रकरणी तहसील कार्यालय अंबड येथील निरीक्षण अधिकारी किरणकुमार शत्रुघ्न खांडेभराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख नसीर अब्बास बागवान याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 च्या कलम 3 आणि 7 अन्वये गुन्हा (रजि. नं. 0528/2026) दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (SI) भगवान नरोडे करत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
कवठे एकंद–नागाव परिसरात केबल-मोटार चोरांचा धुमाकूळ; तासगाव पोलिसांचा तपास कुठे अडकला | बँक ऑफ महाराष्ट्रची ३ कोटींची फसवणूक; ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; इस्लामपूर येथील बनावट सातबारा प्रकरण | अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप उजळतोय अकराव्या वर्षात ! ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी गोड करणार | भडगाव तहसीलदार कारवाईसाठी जात असताना अपघातात जखमी | रामटेक गडमंदिरात पारंपरिक काकड आरती महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ | अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता, अपहृत मुली, महिला व पुरुषांचा लावला यशस्वी शोध | रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात |