58 महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात कनेडी हायस्कूलचा सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 July 2026 | 👁 143 Views
58 महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात कनेडी हायस्कूलचा सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक
ओरस, ता. १० जुलै : 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने ओरस येथे दि. 1 ते 10 जुलै या कालावधीत वार्षिक संयुक्त प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 400 एनसीसी कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिस्त, नेतृत्व, व्यक्तिमत्त्व विकास, शारीरिक प्रशिक्षण, ड्रिल, शस्त्र हाताळणी, सामाजिक उपक्रम, विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी शिबिर गाजले.
या शिबिरात कनेडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे 25 एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते. संस्थेचे एएनओ गुरव सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग घेतला.
शिबिराच्या समारोपप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी आकर्षक सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. उत्कृष्ट नृत्य व सादरीकरणाच्या जोरावर त्यांनी प्रथम क्रमांक पटकावून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या शिबिराचे प्रमुख कर्नल अजय राज यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, देशभक्ती आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे महत्त्व पटवून दिले.
कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच एएनओ गुरव सर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेच्या नावलौकिकात भर पडली असून परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल |