महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा ,राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार पाचशे कोटी रुपये वितरित होणार

👤 अतुल फसाले | 📅 29 June 2026 | 👁 207 Views
 महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा ,राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार पाचशे कोटी रुपये वितरित होणार
सोलापूर, दिनांक 26:- राज्य शासनाने शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली असून ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ठरणार आहे. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ व महापुरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळावे व कृषी क्षेत्र सक्षम व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात त्यांच्या लोकाभिमुख कार्याला अभिवादन म्हणून या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. याआधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (2017), महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (2019) व प्रोत्साहनपर लाभ योजना (2022) राबविण्यात आल्या होत्या.

योजनेची वैशिष्ट्ये-
कर्जमुक्ती मर्यादा : प्रति शेतकरी 2 लाख रुपयांपर्यंत थेट कर्जमुक्ती.अल्पमुदत पीक कर्ज : 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेले कर्ज पात्र.जमीन धारणेची अट नाही : सर्व शेतकऱ्यांना लाभ.एकवेळ समझोता योजना : 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा भरल्यानंतर शासनाचा लाभ.प्रोत्साहनपर लाभ : नियमित परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन.

अपात्र गट- मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, 25 हजारांपेक्षा जास्त वेतन घेणारे अधिकारी-कर्मचारी, आयकर भरणारे व निवृत्तीवेतनधारक (माजी सैनिक अपवाद) यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाभार्थी व निधी- या योजनेत सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून 36,500 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक असेल.

ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देणे हा उद्देश आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |