श्री सिद्धेश्वर मंदिर विकासासाठी सुनील भोंबे यांची ₹4.21 लाखांची देणगी

👤 बळीराजा भराडे परभणी | 📅 19 July 2026 | 👁 195 Views
श्री सिद्धेश्वर मंदिर विकासासाठी सुनील भोंबे यांची ₹4.21 लाखांची देणगी
मंदिर समितीतर्फे सत्कार; विकासकामांसाठी भाविकांनी पुढे येण्याचे आवाहन
जिंतूर येथील पुरातन काळातील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या विकासासाठी सामाजिक बांधिलकी जपत उद्योजक व समाजसेवक सुनील भोंबे पाटील यांनी ₹4 लाख 21 हजारांची देणगी धनादेशाद्वारे मंदिर समितीकडे सुपूर्द केली. या उदात्त योगदानाबद्दल मंदिर समितीतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागोराव जाधव होते. प्रमुख उपस्थितीत अॅड. विजयराव देशमुख, नगराध्यक्ष प्रताप देशमुख, नगर सेवक गोपाळ रोकडे, डॉ. दुर्गादास कानडकर, दत्तराव गाडेकर व गंगाप्रसाद घुगे, प.स. अध्यक्ष किशोर खिस्ते, यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत सुनील भोंबे पाटील यांनी मंदिर विकासासाठीचा धनादेश मंदिर समितीकडे सुपूर्द केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. विजयराव देशमुख यांनी केले. यावेळी नागोराव जाधव व नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी मनोगत व्यक्त करत, श्री सिद्धेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी भाविक व दानशूर व्यक्तींनी अशाच प्रकारे पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. भाविकांच्या सहकार्यामुळे मंदिरासह परिसराचाही विकास साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आभार विष्णू गाडेकर यांनी मानले.कार्यक्रमास व्यापारी, मंदिर समितीचे सदस्य धनंजय जाधव , अनिल गाडेकर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा |