ईश्वरपूर मध्ये अहिल्यादेवी जयंती निमित्त 13 जुन रोजी भव्य दिव्य मिरवणूक

👤 राहुल टिबे सांगली | 📅 09 June 2026 | 👁 356 Views
ईश्वरपूर मध्ये अहिल्यादेवी जयंती निमित्त 13 जुन रोजी भव्य दिव्य मिरवणूक
अखंड धनगर समाजाचे श्रद्धास्थान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री श्री आण्णासाहेब डांगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धनगर समाज महासंघातर्फे श्री राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे आणि विश्वनाथ रामचंद्र डांगे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक 13 जून रोजी भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. ईश्वरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ, तहसीलदार कार्यालय येथून दुपारी तीन वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल.यामध्ये महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील 21 महंत तसेच सर्व प्रमुख मानकरी उपस्थित राहणार आहेत. या मिरवणुकीमध्ये उंट,घोडे, जिवंत देखावे, पारंपारिक वाद्य धनगरी ढोल कैताळ, इत्यादीचा समावेश असणार आहे. सर्व समाज बांधवांनी आपल्या पारंपारिक धनगरी पोशाखात मोठ्या प्रमाणावर मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान धनगर समाज महासंघ तर्फे करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |