वयोवृद्ध महिलेच्या डोळ्यात पाणी, डसा .. डसा रडली पण गेंड्याच्या कातड्याचे गॅस एजन्सीवाल्यांना नाही ओ आली दया ......

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 07 May 2026 | 👁 170 Views
वयोवृद्ध महिलेच्या डोळ्यात पाणी, डसा .. डसा रडली पण गेंड्याच्या  कातड्याचे गॅस एजन्सीवाल्यांना नाही ओ आली दया ......
आटपाडी तालुक्यातील गॅस वाहतूक करणाऱ्या गाड्या बुधवारी व शनिवारी झरे परिसरामध्ये येत असतात व ग्राहकांना गॅस पुरवत असतात. अलीकडच्या काळामध्ये बुकिंग केल्याशिवाय किंवा ओटीपी सांगितल्याशिवाय गॅस मिळत नाही असा नियम असला तरी कामगार व काही खाजगी एजंट दडग्या रस्त्याने गॅस बुकिंग करून ओटीपी घेऊन गॅस घेतात व समोर च्या पार्टीला तिप्पट किमतीने म्हणजेच 2800 रुपयाला विकतात.
आजही गॅस सिलेंडरच्या वाहतूक करणाऱ्या गाड्या जरी परिसरामध्ये आल्या होत्या. तर एक साठी ओलांडलेली वयोवृद्ध महिला गॅस घेण्यासाठी थांबली होती. तिचा मुलगा मयत असून सुनबाई मुंबई येथे राहते . तिच्या स्वतःजवळ ना मोबाईल ना आधार कार्ड अशी कोणतीही कागदपत्रे नव्हती . पण त्यामुळे वयोवृद्ध महिलेचा गॅस संपला होता गॅस एजन्सीच्या कामगारांना ती हात जोडत होती विनंती करत होती की मला गॅस द्या माझ्या घरी कोणी नाही मी स्वतः एकटीच आहे चुलीवर स्वयंपाक करता येत नाही धुरामुळे डोळ्यातून पाणी येते माझं वय झालं आहे असे विनंती करत होते परंतु निर्भीड कामगारांना व मालकाला त्या वयोवृद्ध महिलेची दया आली नाही .

त्या वयोवृद्ध महिलेच्या डोळ्यांमध्ये पाणी उभा राहिले परंतु निर्भीड कामगारांना त्याचे काहीच वाटले नाही. निर्भीड काळजाचे कामगार व गॅस एजन्सी चे मालक यांनी त्या महिलेला सिलेंडर दिला नाही...

मात्र कुणाच्याही नावावर सिलेंडर खाजगी एजंटांना दिला जातो आणि ते खाजगी एजंट 2800 रुपये प्रमाणे सिलेंडरची विक्री करतात. हे कामगारांना व मालकांना चालते परंतु एका आपल्या आईच्या आजीच्या वयाच्या वयोवृद्ध महिलेला सिलेंडर दिला जात नाही हीच का गॅस सिलेंडर वाल्यांची माणुसकी.

कामगार व खाजगी एजंट 2800 रुपयाला गॅस विकतात हे गॅस एजन्सीच्या मालकाला चालते, परंतु एक वयोवृद्ध महिला विनंती करते तिला एखादा गॅस ॲडजेस्ट करून दिला जात नाही. म्हणजे गॅस एजन्सी मालकाकडे किंवा कामगाराकडे माणुसकी आहे की नाही याबाबत चर्चा नागरिकांत सुरू आहे.
खाजगी एजंटांकडून ग्राहकांची लूट केलेली गॅस कामगार व एजन्सी चे मालक यांना चालते पण ज्या महिलेचा मुलगा मयत आहे सुनबाई मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईला राहते ही वयोवृद्ध महिला एकटीच इथे राहते ती स्वयंपाक कशावर करणार याची थोडीफार तरी दया यायला हवी होती परंतु असं घडलं नाही.
यांना दया येते ती कोणाची जे खाजगी एजंट काळाबाजार करून कोणाच्याही नावावरती गॅस बुकिंग करून 2800 रुपये विक्री करतात त्याची दया या लोकांना येते म्हणजे आज काल या जगामध्ये माणुसकी जिवंत आहे की नाही हा गंभीर प्रश्न आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |