सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलढाणा प्रादेशिक पर्यटन निधी अंतर्गत माझ्या अथक प्रयत्नांतून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संस्थान, शेलसूर येथे १५ लक्ष रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून, आज या सभागृहाचा भव्य लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेची मनोभावे आरती करून दर्शन घेतले. ग्रामस्थांनी केलेल्या आत्मीय सत्कारामुळे मी भारावून गेले होते. हे सभागृह धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ग्रामस्थांना मोठा आधार ठरेल, असा विश्वास आहे.
शेलसूर या शेतकरी व वारकरी परंपरेच्या गावात आज विकासाची पंढरी साकार झाली आहे. उपस्थित ग्रामस्थ, वारकरी व शेतकरी बांधवांशी संवाद साधताना विविध विकासकामांचा आढावा मांडला. पांडुरंगाच्या भक्तीला विकासकार्याची जोड देत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा संकल्पही व्यक्त केला.
यावेळी सांगितले की, आजपर्यंत ज्या शेतरस्त्यांना सरकारी नकाशावर स्थान नव्हते, ते रस्ते आता नकाशावर आणण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासन ठोस पावले उचलत आहे. मात्र, शेतकरी बांधवांच्या सहकार्याशिवाय ही कामे पूर्ण होऊ शकत नाहीत, हेही स्पष्ट केले.
वारकरी परंपरेतील पांडुरंग हा केवळ देव नाही, तर तो शेतकऱ्यांचा आत्मा आणि सामान्य माणसाचा आधार आहे, असे सांगत भक्ती आणि विकास यांची सांगड घालणे हेच आपले ध्येय असल्याचे नमूद केले. महायुती सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची जनतेशी असलेली नाळ हेच आपल्या कार्याचे बळ असल्याचेही अधोरेखित केले.
या सोहळ्यास देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी सर्वश्री राजेंद्र काळे, अरविंद देशमुख, माजी सभापती, सदाशिव काळे, दिनकर काळे, रामदास रिंढे, पुरुषोत्तम धुंदळे, दिलीप मामा काळे, नरेंद्र कापसे, दिलीप रिंढे, एल. के. वरपे सर, रमेश घ्याळ, वसंतराव कापसे, मनोहर रिंढे, निर्मलाताई रिंढे, सरस्वती रिंढे, पुष्पाताई काळे, भगवान धारणकर, महादू अंधारे, शंकर घरपाहुणे, गोकुळसिंग राजपूत, गजानन रिंढे, दिलीप घ्याळ, मोहन घ्याळ, बाळनाथ घ्याळ आदींसह ग्रामपंचायत पदाधिकारी, वारकरी मंडळाचे प्रतिनिधी, स्थानिक शेतकरी बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.