उद्धट उत्तर देण्याऱ्या वीजवितरण अधिकाऱ्याला आचरा ग्रामस्थांनी धरले धारेवर आचरा ग्रामस्थ वीज बिले न भरण्याचा घेणार ग्रामसभेत ठराव

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 26 June 2026 | 👁 126 Views
उद्धट उत्तर देण्याऱ्या वीजवितरण अधिकाऱ्याला आचरा ग्रामस्थांनी धरले धारेवर  आचरा ग्रामस्थ वीज बिले न भरण्याचा  घेणार ग्रामसभेत ठराव

भूमिगत विद्युत वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली सोमवारी आचरा सब स्टेशनवरून दिवसभर विद्युत पुरवठा खंडीत ठेवला होता त्यानंतरही पुन्हा वारंवार खंडित होत राहिल्याने मंगळवारी संतप्त ग्रामस्थांनी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत कार्यालयावर धडक दिली. यावेळी आचरा कार्यालयात कोणतेही सक्षम अधिकारी हजर नव्हते ग्रामस्थ जमा झाल्याचे समजल्यानंतर तब्ब्ल तसाभराने आतरिक्त कार्यभार स्वीकारून हजर झालेल्या अधिकाऱ्याने आचरा सरपंचासह उपस्थित ग्रामस्थांना उद्धट उत्तरे दिल्याने ग्रामस्थांनी त्या अधीकाऱ्याला चांगलेच धरेवर धरत गावातून एकही वीजबिल भरले जाणार असल्याचे अधिकाऱ्याला सांगत त्यासाठी आचरे गावाची विशेष ग्रामसभा बोलवण्याचा निर्णय घेत भूमिगत विद्युत वाहिनी दुरुस्तीच्या नावाखाली वीज खंडीत केल्यास पूर्ण गाव जमवून वीज वितरणला धडक देणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

यावेळी सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्यासह पंस सदस्य गणेश तोंडवळकर,उपसरपंच संतोष मिराशी, चावलं मुजावर पंकज आचरेकर, जयप्रकाश परुळेकर, परेश सावंत, शैलेश मुणगेकर नातू, सिद्धार्थ कोळगे अरविंद घाडी,उमेश सावंत, सौमित्र राणे, दीपक आचरेकर, दिलीप कोदे, ग्रामस्थ उपस्थित होते.
गेला महिनाभर वारंवार खंडित होणा-या वीजपुरवठयामुळे आदीच हैराण झालेले आचरावासियांनी सोमवारी दिवसभर मेन्टेनन्स च्या नावाखाली खंडित ठेवलेला होता. तरीही रात्री आठ ते दहा वेळा लाईटचे ये जा चालूच होते. मंगळवारी सकाळीही तीच स्थिती होती सोमवारी रात्र अंधारातच जागून काढलेल्या ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंतच झाला. यामुळे संतप्त आचरा ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा बाजारपेठ येथील वीज मंडळ कार्यालयावर धडक दिली. आचरा गाव व पंचक्रोशीत मोठी लोकवस्ती आहे वीज वीज ग्राहक, बँका, इतर संस्था मोठया प्रमाणात आहेत असे असताना आचरा वीज वितरण कार्यालयात मात्र एकही अधिकारी उपस्थित नव्हता आचरा येथील कार्यालयाचा चार्ज कोणाकडे आहे याचीही अधिकृत माहिती कार्यालयात उपलब्ध नव्हती ग्रामस्थ जमा झाल्याचे समजताच विरण येथील अधिकारी अतिरिक्त कार्यभार घेऊन तब्बल एका तासाने हजर झाले. तासभर वाट बघितल्यानंतर हजर झालेल्या अधीकाऱ्यावर ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती केली यावेळी सरपंच जेरोन फर्नांडिस यांनी विजेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपस्थित अधिकारी यांनी उद्धट उत्तरे देऊ लागलेत यावेळी सरपंच आणि ग्रामस्थ यांचा पारा चढला होता उद्धट उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्याने शेवटी नरमाईची भूमिका घेतल्याने शेवटी निर्माण झालेला तणाव शांत झाला यावेळी आपली तक्रार आमदार निलेश राणे यांच्याकडे केली जाणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यापुढे सुरु न झालेल्या भूमिगत वाहिनीसाठी विद्युत पुरवठा खंडीत करू देणार नाही असा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला कोट्यावधी रुपये खर्च करून एकदाही सुरु न झालेली विद्युत वाहिनी दुरुस्त करायच्या नावाखाली गेले वर्षभर वीज खंडीत करून वीज वितरण ग्रामस्थांना वेठीस धरत आहे या अधिकाऱ्यांचे ठेकेदाराशी साठेलोटे असून त्याला पाठीशी घालण्याचे काम अधिकारी करत असून सदोष असणारी विद्युत वाहिनी सुरु करणार असल्याची खोटी आश्वासने अधिकारी देत असून दिशाभूल करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला
आचरा वीज वितरण ग्राहकांना वेठीस धरत आहे. अधिकारी बेजबाबदारपणे उद्धट उत्तरे देत आहेत. यापुढे वीज वितरणची कोणतीही बाजू ऐकून घेतली जाणार नाही, आठ महिन्यापूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनापैकी एकही आश्वासन वीज वितरण ने पूर्ण केलेले नाही. वीज वितरणच्या कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. आचरे गावाची विशेष ग्रामसभा बोलावली जाणार आहे गावातून एकही वीजबिल भरले जाणार नाही असा ठराव घेऊन एकही वीजबिल भरणार नसल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
फोटो
वीज प्रश्नी विचारणा केल्यानंतर वीज वितरण अधिकाऱ्याने उद्धट उत्तरे दिल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |