फोंडाघाट हादरले रात्रीच्या सुमारास भूकंपसदृश्य धक्के; घरांच्या भिंतींना तडे

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 26 June 2026 | 👁 188 Views
फोंडाघाट हादरले  रात्रीच्या सुमारास भूकंपसदृश्य धक्के; घरांच्या भिंतींना तडे
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील विद्यानगर-बेलदारवाडी परिसरात मंगळवारी (दि. २३) रात्री सुमारे ११.३० ते ११.४५ वाजण्याच्या दरम्यान भूकंपसदृश धक्के जाणवल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या धक्क्यांमुळे परिसरातील चार घरांचे नुकसान झाले असून घरांच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. या घटनेत रविंद्र सुरेश चव्हाण, दत्ताजी सुरेश चव्हाण, सोमनाथ सुरेश चव्हाण तसेच बाळू मारुती चव्हाण यांच्या घरांना तडे जाऊन नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत फोंडाघाटच्या सरपंच संजना संजय आग्रे यांनी बुधवारी सकाळी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सरपंच आग्रे यांनी या घटनेची माहिती संबंधित शासकीय यंत्रणांना दिली असून नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून नागरिकांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच परिसरातील नागरिकांनी कोणतीही अडचण अथवा समस्या असल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |