कृषी विभागातील सुधारणा व शेतकरी सक्षमीकरणावर भर : पालकमंत्री विखे पाटील यांचे निर्देश

👤 संकेत सानप मुंबई | 📅 16 May 2026 | 👁 178 Views
कृषी विभागातील सुधारणा व शेतकरी सक्षमीकरणावर भर : पालकमंत्री विखे पाटील यांचे निर्देश
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उपस्थित राहून कृषी विभागाच्या नियोजनाचा तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी खरीप हंगामासाठी आवश्यक नियोजन, पीक विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कृषी विभागातील त्रुटींमध्ये सुधारणा तसेच शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी कृषी संशोधन क्षेत्रात व्यापक काम करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आगामी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन व प्रशासन समन्वयाने कार्य करत आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी पंकज आशिया, आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार श्री. विक्रम पाचपुते तसेच कृषी व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |