जनगणना २०२७ : महाराष्ट्रात स्व-गणना प्रक्रियेला प्रारंभ; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

👤 संकेत सानप मुंबई | 📅 12 May 2026 | 👁 114 Views
जनगणना २०२७ : महाराष्ट्रात स्व-गणना प्रक्रियेला प्रारंभ; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
जनगणना २०२७ अंतर्गत स्व-गणना प्रक्रियेला महाराष्ट्रात सुरुवात झाली असून महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी संगणकाद्वारे एसई (Self Enumeration) पोर्टलवर आपली माहिती नोंदवून या उपक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी भारत सरकारच्या सहसचिव तथा राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे आणि जनगणना कार्य संचालनालयाचे सहसंचालक संतोष पायस उपस्थित होते.
याप्रसंगी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून मोठ्या संख्येने ‘स्व-गणना’ सुविधेचा पर्याय निवडावा, असे आवाहन केले. महाराष्ट्र राज्यासाठी स्व-गणना (एसई) पोर्टल १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत कार्यरत राहणार आहे.
डॉ. निरुपमा डांगे यांनीही राज्यातील अधिकाधिक नागरिकांनी आपल्या कुटुंबाची माहिती जनगणना २०२७ च्या घरयादी व घरगणना प्रक्रियेत एसई पोर्टलवर नोंदवून या देशव्यापी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
जनगणना प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नागरिकांना सुलभ आणि पारदर्शक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |