मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मालवणी भवन’उभारणार ; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 26 June 2026 | 👁 202 Views
मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मालवणी भवन’उभारणार ; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा
पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार मराठी भाषेचा मालवणी भाषा ही अविभाज्य घटक त्याचे संवर्धन करणार कोकणातील मालवणी भाषा व संस्कृतीला मिळणार नवे व्यासपीठ

मालवणी ही बोली भाषा असल्यामुळे मराठी भाषेतच येते त्याच्यामुळे मालवणी भवन देखील बांधायला मालवणला काही हरकत नाही. त्याच्यासाठी देखील आपण निधी उपलब्ध करून देऊ. अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली.तर यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले. मालवणी भवन उभारण्याबाबत कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जनतेची भावना लक्षात घेऊन घेतलेल्या या निर्णयाबद्दल मी उदय सामंत यांचे मनापासून आभार मानतो, असे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सभागृहात सांगितले.

मालवणी भाषा, संस्कृती, साहित्य आणि परंपरा जतन व संवर्धन करण्यासाठी हे भवन महत्त्वाचे ठरणार असून कोकणातील मालवणी भाषिकांसाठी ही घोषणा दिलासादायक मानली जात आहे.
मालवणी भाषा ही मराठी भाषेचाच एक अविभाज्य भाग असल्याने मालवण येथे ‘मालवणी भवन’ उभारण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट करत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा विधानसभेत केली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |