सरूड-बांबवडे परिसरातील तरुणांना उद्योजकतेची नवी संधी; अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मंजुरीपत्रांचे वितरण"

👤 प्रदीप जानकर शाहुवाडी | 📅 18 July 2026 | 👁 366 Views
सरूड-बांबवडे परिसरातील तरुणांना उद्योजकतेची नवी संधी; अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मंजुरीपत्रांचे वितरण"
महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण माजी आमदार सत्यजित पाटील (आबा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
या योजनांमुळे सरूड व बांबवडे परिसरातील मराठा समाजासह स्वतंत्र महामंडळाची सुविधा नसलेल्या इतर खुल्या प्रवर्गातील तरुण-तरुणींना स्वयंरोजगार, नवीन उद्योग आणि व्यवसाय उभारणीसाठी मोठा आर्थिक आधार मिळणार असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.
महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रमुख योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (₹15 लाखांपर्यंत), गट/उद्योग कर्ज व्याज परतावा योजना (₹50 लाखांपर्यंत) तसेच गट कर्ज योजना यांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व व्यावसायिक वाहनांसाठी घेतलेल्या ₹15 लाखांपर्यंतच्या बँक कर्जावरही व्याज परतावा दिला जातो.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप पाटील, पंचायत समिती सदस्य बाबुराव पाटील, गटनेते व सदस्य अभयसिंह चौगुले तसेच डॉ. जयवंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
लाभार्थ्यांनी शासनाच्या या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन स्वतःचा उद्योग उभारावा आणि रोजगारनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
कवठे एकंद–नागाव परिसरात केबल-मोटार चोरांचा धुमाकूळ; तासगाव पोलिसांचा तपास कुठे अडकला | बँक ऑफ महाराष्ट्रची ३ कोटींची फसवणूक; ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; इस्लामपूर येथील बनावट सातबारा प्रकरण | अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप उजळतोय अकराव्या वर्षात ! ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी गोड करणार | भडगाव तहसीलदार कारवाईसाठी जात असताना अपघातात जखमी | रामटेक गडमंदिरात पारंपरिक काकड आरती महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ | अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता, अपहृत मुली, महिला व पुरुषांचा लावला यशस्वी शोध | रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात |