झरेतील बँक ऑफ इंडिया चा मनमानी कारभार खातेदाराच्या सहमतीशिवाय परस्पर दुसऱ्या खात्यावर पैसे ट्रान्सफर...

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 22 April 2026 | 👁 212 Views
झरेतील बँक ऑफ इंडिया चा मनमानी कारभार खातेदाराच्या सहमतीशिवाय परस्पर दुसऱ्या खात्यावर पैसे ट्रान्सफर...
झरे ता. आटपाडी येथील बँक ऑफ इंडिया मध्ये खातेदाराच्या परस्परच खातेदाराच्या खात्यावरील पैसे दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर केले जातात. याबाबत त्या खातेदाराला कोणतीही सूचना दिली जात नाही. एका खात्यावरील दुसऱ्या खात्यावर पैसे ट्रान्सफॉर्म करण्याची बँकेला परवानगी आहे का ? हाही संशोधनाचा विषय आहे.
बँक ऑफ इंडिया मध्ये अनेक खातेदारांची खाते आहेत. काही जणांची सेव्हिंग खाते आहेत तर काही जणांचे कर्ज खाते आहेत. परंतु त्या खातेदाराने आपल्या गरजेपोटी सेव्हींग खात्यावर पैसे ठेवत असतो.
या भागामध्ये शेतकरी वर्ग आहे. अचानक खातेदाराला पैशाची गरज पडते स्वतःजवळ पैसे ठेवले तर ते खर्चून जातात, म्हणून प्रत्येक खातेदार हा खात्यावर पैसे ठेवतो आणि बँक मात्र खातेदाराला कोणतीही सूचना न देता खातेदाराच्या खात्यावरील परस्पर पैसे इतर खात्यावर वर्ग करतात ,उदाहरण कर्ज खाते किंवा इतर खात्यावर , कर्जाच्या खात्यावर जर पैसे वर्ग केले तर जो कर्जाचा हप्ता आहे, किंवा त्याचे व्याज आहे. तेवढीच रक्कम खातेदाराच्या सहमतीने रक्कम घ्यायला हरकत नाही.परंतु खातेदाराच्या परस्पर व्याजाच्या किंवा हप्त्याच्या जादा रक्कम कर्ज खात्याला वर्ग केली जाते.अशी अनेक उदाहरणे आहेत.
खातेदाराला विचारल्याशिवाय खातेदाराला सूचना दिल्याशिवाय बँक परस्पर खात्यावरील पैसे दुसऱ्या खात्यावर घेत असते .परंतु त्या खातेदाराला त्याची कल्पनाही नसते.
जेवढी व्याजाची रक्कम आहे किंवा हप्त्याची रक्कम आहे तेवढी रक्कम घेतली तर काही हरकत नाही. परंतु ज्यादा रक्कम कर्जाच्या खात्याला वर्ग करून घेतात .त्यामुळे भविष्यामध्ये खातेदार त्या बँकेमध्ये व्यवहार करण्यास धजवणार नाही...
खातेदाराच्या पूर्वसंमतीशिवाय पैसे ट्रान्सफर करून घेणे हे बेकायदेशीरित्या आहे .त्या खातेदाराला सूचना देऊन पैसे ट्रान्सफॉर्मर करणे योग्य आहे. परंतु बँक ऑफ इंडियाच्या या मनमानी कारभारामुळे बँकेच्या व्यवहारावर 100% परिणाम होणार असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.
खातेदाराने पैसे काढण्याची स्लिप भरून दिली तर पैसे काढता येतात पण ग्रामीण भागात त्या खातेदाराला कोणतीही पूर्व सूचना नं देता.किंवा कोणतीही पैसे काढण्याची स्लिप भरून न घेता त्या खातेदाराच्या खत्यावरील पैसे इतरत्र पैसे वाळवा वळवी करून घेतात..
बँकेत गेल्यानंतर पैसे काढायचे असले तर पहिल्यांदा पैसे काढण्याची स्लिप भरून घेतात किंवा पैसे भरायचे असतील तर पैसे भरणा करण्याची स्लिप भरून घेतात परंतु अलीकडच्या काळामध्ये ऑनलाईन प्रोसेस झाल्याने बँकेचे कर्मचारी स्वतः बँकेतूनच खातेदाराला कोणतीही सूचना न देता या खात्यावरील त्या खात्यावर पैसे वळवून घेतात. त्यामुळे अनेक खातेदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
याबाबत बँकेत काही अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की ज्या खात्यावर पैसे जास्त आहेत ते तुमच्याच दुसऱ्या खात्यावरती ट्रान्सफर मारले जातात काही जणांचे कर्ज खाते आहे त्याचे व्याज थकले तर सेव्हिग खात्यावरचे ट्रान्स्फर केले जातात... असे सांगण्यात आले
पण खातेदाराला कोणतीही कल्पना न देता असे अचानक पैसे ट्रान्सफर करणे योग्य आहे का ? त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कर्जाच्या खात्याला पैसे हे भरलेच पाहिजेत .याबाबत कोणाचेही दुमत नाही पण अचानक दुसऱ्या खात्यातून पैसे डेबिट करणे आणि कर्जाच्या खात्यावर भरून घेणे त्या खातेदाराला सूचना देऊन पैसे दुसऱ्या खात्याला ट्रान्सफॉर्म केले तर खातेदाराला दुःख वाटणार नाही. परंतु खातेदाराला कोणतीही कल्पना न देता बँकेमध्येच या खात्यावर त्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जात आहेत.पैसे काढायचे किंवा भरायचे म्हटले तर स्लिप भरावी लागते किंवा चेक द्यावा लागतो परंतु बँकच या खात्यावरून त्या खात्यावरती पैसे घेत असताना कोणत्याही पद्धतीचा चेक येत नाहीत किंवा कोणतीही करून घेत नाही हे कितपत योग्य आहे. याबाबत खातेदाराकडून नाराजी व्यक्त होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |