“संगमनेरमध्ये हिंदू एकतेचा विराट जागर! भव्य हिंदू संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”आमदार अमोल खताळ

👤 संकेत तुकाराम सानप मुंबई | 📅 16 May 2026 | 👁 356 Views
“संगमनेरमध्ये हिंदू एकतेचा विराट जागर! भव्य हिंदू संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”आमदार अमोल खताळ
संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे ‘सकल हिंदू समाज’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य हिंदू संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिंदू समाजामध्ये एकता दृढ करणे, संस्कृतीचे जतन करणे आणि सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन चालण्याच्या उदात्त उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
संमेलनामध्ये धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक ऐक्य याबाबत प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या परंपरा, संस्कार आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी समाजाने एकत्रित राहण्याची गरज वक्त्यांनी अधोरेखित केली. धर्माभिमान जागवण्यासोबतच समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या संमेलनातून देण्यात आला.
हिंदू समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संस्कृती रक्षणासाठी सर्वांनी एकदिलाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या यशस्वी आयोजनाबद्दल ‘सकल हिंदू समाज’च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे आणि उपस्थित नागरिकांचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |