"सर्व्हर डाउन की व्यवस्था कोमात? ज्येष्ठ नागरिकांचा दाखला रखडला, आटपाडी तहसीलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

👤 दै आखुर आटपाडी | 📅 28 April 2026 | 👁 134 Views
"सर्व्हर डाउन की व्यवस्था कोमात? ज्येष्ठ नागरिकांचा दाखला रखडला, आटपाडी तहसीलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
आटपाडी, दि. 28 एप्रिल 2026

आटपाडी तहसील कार्यालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी सुमारे 11 वाजता नागरिक कामानिमित्त कार्यालयात आले असता, बहुतांश कर्मचारी आपल्या जागेवर अनुपस्थित असल्याचे दिसून आले. दुपारी सुमारे 2.45 वाजेपर्यंतही अनेक कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून "सर्व्हर डाऊन" असल्याचे कारण देण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांची कामे दिवसेंदिवस रखडत असल्याचे चित्र आहे. दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज केलेल्या एका प्रकरणाला आजपर्यंत मंजुरी मिळालेली नाही. विशेष म्हणजे हे प्रकरण 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिक सौ. यशोदा बापू कोळी यांचे असून, त्यांचा दाखला संबंधित अधिकारी वाघमोडे मॅडम यांच्या टेबलवर प्रलंबित आहे.
दिनांक 20 एप्रिल रोजी चौकशी केली असता "सर्व्हर डाऊन" असल्याचे सांगून अर्जदाराला परत पाठवण्यात आले, तसेच दाखला मिळण्यास 15 दिवसांची मुदत असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या संदर्भातील प्रकरण असल्याने तत्परतेने कार्यवाही होणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
शासन स्तरावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने वागणूक देण्यासाठी विविध योजना आणि नियम लागू करण्यात आले आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे “शासनाच्या योजना केवळ कागदावरच मर्यादित आहेत का?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून प्रशासनात शिस्त आणावी, तसेच सर्वसामान्य नागरिकांना वेळेत सेवा मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच मा. मुख्यमंत्री, मानव अधिकार आयोग व जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा | सर्व दिंडी सोहळे पंढरपूर नगरीमध्ये दाखल" |