आष्टीतील भीषण पाणीटंचाईने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; अनेक भागांत टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ

👤 परतूर प्रतिनिधी :- हनुमंत दवंडे | 📅 22 November 2026 | 👁 5 Views
आष्टीतील भीषण पाणीटंचाईने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; अनेक भागांत टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ
परतूर :- परतूर तालुक्यातील आष्टी शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत वर्गणी गोळा करून पाइपलाइनद्वारे कॅनॉलचे पाणी नंदिनी नदीत आणले. नागरिकांच्या या सामूहिक प्रयत्नामुळे शहरातील अनेक भागांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आष्टी शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनीच पुढाकार घेत आपापसांत पैसे जमा केले आणि पाइपलाइनच्या माध्यमातून कॅनॉलचे पाणी नंदिनी नदीपर्यंत आणण्याची व्यवस्था केली.या उपक्रमामुळे साठे नगर, आंबेडकर नगर, पूरा बाजार, रविदास नगर, गवळी गल्ली, गत्ते गल्ली, पहाडी मोहल्ला, गढी मोहल्ला आणि राज गल्ली यांसह शहरातील अनेक भागांतील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.नागरिकांच्या एकजुटीतून पाणीप्रश्नावर तोडगा
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम शेळके, अलीम चाऊस शेख,अनंत आगलावे, दस्तगीर जमींदार, शौकत सय्यद, मुजीब भाई राज, पवन आव्हाड, तोफिक शेख, अकील कुरेशी आदींनी सहकार्य केले. नागरिकांनी एकजुटीने पुढाकार घेतल्याने हा उपक्रम शक्य झाला.
टँकरने पाणी विकत घेण्याची नागरिकांवर वेळ
एकीकडे नागरिक स्वतःच्या पैशातून पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील अनेक भागांत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या खिशाला पाणी विकत घेण्यासाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी
नागरिकांनीच वर्गणी गोळा करून पाण्याची व्यवस्था करावी लागत असेल, तर ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाची जबाबदारी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. आष्टी शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, नियमित पाणीपुरवठा सुरू करावा आणि या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या बदनापूर तालुकाध्यक्षपदी विलास खैरे यांची नियुक्ती! | आष्टीतील भीषण पाणीटंचाईने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; अनेक भागांत टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ | *भडगाव दिवाणी न्यायालयात विशेष लोकअदालत संपन्न; २५ हजार रुपयांची वसुली* | लोण प्र. ऊ. येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न; लोकनियुक्त सरपंच ॲड. बी. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा तार कंपाऊंडसह स्वच्छता आणि गटार कामांचा शुभारंभ* | कापूस आणि धान्य खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करावीत; 'महाराष्ट्र शेतकरी संघटने'ची प्रशासनाकडे मागणी* | *मा. उच्च न्यायालयाच्या विनंतीचा आणि न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेचा सन्मान राखत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तात्पुरत्या स्वरूपात स्थगित; मागण्यांच्या पूर्ततेपर्यंत लढा कायम ठेवण्याचा निर्धार* | तासगावात द्राक्षबागेतील लोखंडी अँगल चोरणारी टोळी जेरबंद; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त! सांगली एलसीबी यांची धडक कारवाई | दिव्यांगांच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात; २,५०० नव्हे, ६,५०० रुपये मानधनाची मागणी! | संपादक दिलीप राठी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; कारवाईसाठी बदनापूर पत्रकारांचे पोलिसांना निवेदन | नानेगावच्या अखंड हरिनाम सप्ताहाला मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट! |