*भडगाव दिवाणी न्यायालयात विशेष लोकअदालत संपन्न; २५ हजार रुपयांची वसुली*
👤 शुभम सुराणा जळगाव |
📅
21 November 2026 |
👁 103 Views
भडगाव ( विषेश प्रतिनिधी) :
राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ, भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दिवाणी न्यायालयात शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर २०२६) विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष लोकअदालतीत तडजोडीअंती २५ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या लोकअदालतीच्या कामकाजासाठी पॅनल प्रमुख म्हणून मा. न्यायाधीश पी. व्ही. राजळे यांनी, तर पॅनल सदस्य म्हणून ॲड. पी. जी. सोनवणे यांनी काम पाहिले.
परस्पर सामंजस्याने आणि तडजोडीने दावे निकाली निघाल्याने पक्षकारांचा वेळ व पैशांची बचत झाली असून, या विशेष लोकअदालतीस न्यायालयीन कर्मचारी होतीलाल पाटील,मनोज वाणी, अभिजीत दायमा, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बी. आर. पाटील, ॲड. आर. के. वाणी व पक्षकारांचे मोलाचे सहकार्य लाभले.