जळगावची ऐतिहासिक परंपरा असलेला रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर यांची पाहणी

👤 शुभम सुराणा जळगाव | 📅 17 November 2026 | 👁 117 Views
जळगावची ऐतिहासिक परंपरा असलेला रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर यांची पाहणी
( पंकज कोळी प्रतिनिधी जळगाव ) –
जळगावची ऐतिहासिक परंपरा असलेल्या रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (दि. १७) संपूर्ण रथोत्सव मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. श्रीराम मंदिर संस्थानपासून जुने जळगाव परिसरातील विविध गल्ल्यांमधून जिथून रथ धावणार आहे, त्या सर्व मार्गांची त्यांनी बारकाईने तपासणी करत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
​पाहणीदरम्यान रस्त्याच्या मधोमध किंवा रथाच्या मार्गाला अडथळा ठरणाऱ्या सर्व विद्युत केबल्स तात्काळ बाजूला करण्याचे निर्देश महापौर काळे यांनी विद्युत विभागाला दिले. तसेच, या मार्गावरील रस्त्यांची डागडुजी आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून रस्ते वाहतुकीस व रथोत्सवास योग्य करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यासोबतच रथोत्सव काळात नागरिकांना व भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याबाबतही महापौरांनी अधिकाऱ्यांना निर्देशित केले.
​या पाहणी दौऱ्याप्रसंगी नगरसेवक कल्पेश सोनवणे, शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता जितेंद्र रंधे, पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
देवस्थान इनाम जमीनधारक शेतकऱ्यांचा २५ नोव्हेंबरला एल्गार; महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'थाळी बजाव' आंदोलन | पाचोरा-भडगावच्या राजकारणात मोठी घडामोड; डॉ. पूनम प्रशांत पाटील यांच्या उमेदवारी कायम | ऊसतोड मजुरांच्या पालावर फुलवली माणुसकीची दिवाळी; स्वरा फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक | बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंठा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप | महिलांच्या प्रसूतीची गोपनीय माहिती सायबर भामट्यांकडे! पाडूळीत ९९ हजारांची ऑनलाइन लूट | जळगावची ऐतिहासिक परंपरा असलेला रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर यांची पाहणी | न्यायदानाचा कणा आज संपावर: भडगाव न्यायालयात 'कामबंद' आंदोलनाचा पहिला दिवस!* | घरातील वायर कट करताना शॉक लागून आई आणि मुलाचा मृत्यू | भडगाव नगरपरिषदेच्या दिरंगाईविरोधात नागरिकाचा एल्गार, भोगवट्याच्या जागेच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरू | जळगाव शहरात एकाच वेळी तीन घरं फोडण्याचा प्रयत्न |