घरातील वायर कट करताना शॉक लागून आई आणि मुलाचा मृत्यू

👤 पंकज कोळी जळगाव | 📅 17 November 2026 | 👁 153 Views
घरातील वायर कट करताना शॉक लागून आई आणि मुलाचा मृत्यू
​जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहरात असोदा रोड परिसरात मंगळवारी (दि. १७) सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. घरामागील तुटलेली किंवा खुली वायर कट करत असताना तरुण मुलाला विजेचा धक्का बसला. मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आईलाही विजेचा तीव्र धक्का बसल्याने माय-लेकाचा उपचारापूर्वीच जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जळगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.
​सुनंदा राजू सपकाळे (वय ५०) आणि राहुल राजू सपकाळे (वय ३०, रा. असोदा रोड, जळगाव) असे मृत माय-लेकाची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी सकाळी असोदा रोड येथील राहत्या घराच्या मागे असलेली एक वायर कट करण्यासाठी राहुल सपकाळे गेला होता. यादरम्यान अचानक आलेल्या विद्युत प्रवाहामुळे त्याला तीव्र विजेचा धक्का बसला. मुलगा अडचणीत आल्याचे पाहताच आई सुनंदा सपकाळे यांनी त्याला वाचवण्यासाठी त्वरित धाव घेतली. मात्र, मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि दोघेही गंभीर जखमी झाले.
​घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत दोन्ही माय-लेकांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. एकाच घरातील माय-लेकाचा असा अचानक मृत्यू झाल्याने रुग्णालयात नातेवाईकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
​अचानक घडलेल्या या दोन मृत्यूंमुळे मयत महिलेचे पती राजू सपकाळे व इतर कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला असून, त्यांच्या दुःखाला पारावार उरलेला नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून, पुढील तपास सुरू आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
देवस्थान इनाम जमीनधारक शेतकऱ्यांचा २५ नोव्हेंबरला एल्गार; महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'थाळी बजाव' आंदोलन | पाचोरा-भडगावच्या राजकारणात मोठी घडामोड; डॉ. पूनम प्रशांत पाटील यांच्या उमेदवारी कायम | ऊसतोड मजुरांच्या पालावर फुलवली माणुसकीची दिवाळी; स्वरा फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक | बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंठा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप | महिलांच्या प्रसूतीची गोपनीय माहिती सायबर भामट्यांकडे! पाडूळीत ९९ हजारांची ऑनलाइन लूट | जळगावची ऐतिहासिक परंपरा असलेला रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर यांची पाहणी | न्यायदानाचा कणा आज संपावर: भडगाव न्यायालयात 'कामबंद' आंदोलनाचा पहिला दिवस!* | घरातील वायर कट करताना शॉक लागून आई आणि मुलाचा मृत्यू | भडगाव नगरपरिषदेच्या दिरंगाईविरोधात नागरिकाचा एल्गार, भोगवट्याच्या जागेच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरू | जळगाव शहरात एकाच वेळी तीन घरं फोडण्याचा प्रयत्न |