उरुण-ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक संत (पीर) श्री संभुअप्पा बावाफन देवस्थानचा वार्षिक यात्रा उत्सव २० ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने धार्मिक विधी, रोजे, फकीर पूजन, भजन, पोवाडा आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रा उत्सवाच्या कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे :
- २० नोव्हेंबर (शुक्रवार) : मंडप चढविण्याचा कार्यक्रम.
- २० ते २४ नोव्हेंबर : रोजे (उपवास).
- २२ ते २४ नोव्हेंबर : फकीर होणे.
- २३ नोव्हेंबर (सोमवार) : गंधरात्र (संदल).
- २४ नोव्हेंबर (मंगळवार) : यात्रेचा मुख्य दिवस, पौर्णिमा व फकीर पूजन. सकाळी जय मल्हार एकतारी भजनी मंडळ, उरुण-ईश्वरपूर यांचा भजन कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता शाहीर प्रसाद आदिनाथ विभुते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होईल.
- २५ नोव्हेंबर (बुधवार) : सकाळी ९ वाजता पोलीस पाटील यांचा मानाचा गलफ व शासकीय गलफ कार्यक्रम. रात्री ८ वाजता श्री. बाळासाहेब चौधरी यांच्या आठवणीतील गाण्यांचा कार्यक्रम.
- २६ नोव्हेंबर (गुरुवार) : रात्री ८ वाजता श्री. बाळासाहेब चौधरी यांच्या आठवणीतील गाण्यांचा कार्यक्रम.
- २७ नोव्हेंबर (शुक्रवार) : रात्री ८ वाजता श्री. समीरभाई, विटा यांचा 'सरगम सदाबहार' गीतांचा कार्यक्रम.
या यात्रा उत्सवासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.