चोपडा येथील शिवबाबा केंद्रात ९० दिप प्रज्वलित करून भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा..*
👤 मिलिंद वाणी चोपडा {जळगाव } |
📅
12 November 2026 |
👁 21 Views
*चोपडा (प्रतिनिधी):-* राजस्थान मधील माउंटआबू स्थित प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मधुबनच्या स्थापनेला ९० वर्ष पूर्ण झाल्याने चोपडा येथील ओमशांती नगरमधील शिवबाबा केंद्रात बलिप्रतिपदा पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ९० दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात व आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. यावेळी शिवबाबा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी मंगलादीदी यांनी मुरली वाचनातून सर्व आत्मे परमात्म्याची लेकरे असून विश्वबंधुत्व, आत्मिक, एकता, शांती, प्रेम आणि निस्वार्थ भावनेचा संदेश दिला. दीप प्रज्वलानातून अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञान सद्भावना आणि सकारात्मकतेचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात पसरावा, असाही संकल्प करण्यात आला. कार्यक्रमात अध्यात्मिक चिंतनासह भाऊबीज सणाचे महत्त्व विशद करण्यात आले. उत्साह, भक्तीभाव आणि आनंदमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ब्रम्हाकुमारी शितलदिदी, सारिका दीदी, करिष्मा दिदी यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी शेकडों भाई-बहिणींची उपस्थिती होती.