परतूरमध्ये ५ नोव्हेंबरला भव्य संत संमेलन व हिंदू धर्म महामेळावा!

👤 हनुमंत दवंडे | 📅 03 November 2026 | 👁 28 Views
परतूरमध्ये ५ नोव्हेंबरला भव्य संत संमेलन व हिंदू धर्म महामेळावा!
‘गो सन्मान आव्हान अभियान २०२६’ अंतर्गत आयोजन; हजारो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा

जालना प्रतिनिधी | हनुमंत दवंडे

परतूर (प्रल्हादपूर) शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘गो सन्मान आव्हान अभियान २०२६’ अंतर्गत भव्य-दिव्य संत संमेलन व हिंदू धर्म महामेळाव्याचे आयोजन गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता या धार्मिक सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

या धर्मकार्याला विविध संत-महंतांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभणार असून, अनेक पूजनीय संत-महाराजांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून गोमातेचा सन्मान, हिंदू धर्माचे संवर्धन, धार्मिक जागृती आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात येणार आहे.

या भव्य धार्मिक कार्यक्रमाला परतूर शहरासह तालुक्यातील हजारो भाविक भक्तांनी, हिंदू बांधवांनी व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे स्थळ : सराफा मार्केट, भाजी मंडई, जुना मोंढा, परतूर, ता. परतूर, जि. जालना.

आयोजक : सकल हिंदू समाज, परतूर (प्रल्हादपूर) शहर व तालुका.

गोमातेचा सन्मान, धर्माचे रक्षण आणि समाजाची एकता — या संकल्पनेतून आयोजित या भव्य धार्मिक सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
फटाक्यांऐवजी आरोग्याचा प्रकाश! सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा 'प्रदूषणमुक्त दिवाळी'चा निर्धार* | सांगली जिल्हा बँकेत माजी खासदार संजय पाटील यांचा विजय :माजी आमदार सुमन पाटील यांचा पराभव! | कामेरी नाका खून प्रकरणातील दोघे आरोपी २४ तासांत जेरबंद; सांगली एलसीबी व ईश्वरपूर पोलिसांची संयुक्त कारवाई. | स्वामी विवेकानंद आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह, देवलापार येथील सोळा वर्षीय विद्यार्थी बेपत्ता | परतूरमध्ये ५ नोव्हेंबरला भव्य संत संमेलन व हिंदू धर्म महामेळावा! | जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप | *जिल्हा परिषद एसीबीचा मोठी कारवाई ! १० हजारांची लाच घेताना उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात* | रान पिकवलं, रेकॉर्ड मोडला! भडगावच्या संजय पाटलांचा ज्वारी उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात डंका; हेक्टरी १०२.२५ क्विंटलचा नवा उच्चांक* | उमरेड - करह्रांडला अभ्यारण्यातील गोठणगाव चा युवा नर वाघ पोहोचला पेंचच्या चोर बाहुली जंगलात | सांगली जिल्हा बँकेच्या रणांगणात राजकीय भूकंपाची चाहूल! |