एका क्षणात होत्याचे नव्हते! भरधाव कारचा भीषण अपघात; तेलंगणातील चालकाचा दुर्दैवी अंत, तिघे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे

👤 कवठेमहांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट | 📅 31 October 2026 | 👁 143 Views
एका क्षणात होत्याचे नव्हते! भरधाव कारचा भीषण अपघात; तेलंगणातील चालकाचा दुर्दैवी अंत, तिघे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे
मिरज-पंढरपूर महामार्गावर काळाचा क्रूर घाला! पुलाच्या कठड्याला धडकून कार थेट खड्ड्यात; तेलंगणातील चालकाचा जागीच मृत्यू, तिघांची मृत्यूशी झुंज!
मिरज-पंढरपूर महामार्गावर शनिवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास मृत्यूचा थरार अनुभवायला मिळाला. भोसे गावच्या हद्दीतील सुतार वस्ती ते खरसिंग फाटा दरम्यान एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. पुलावरील संरक्षक कठड्याला जोरदार धडक दिल्यानंतर कार थेट रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली. या दुर्घटनेत कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील अन्य तिघे गंभीर जखमी झाले. अपघातातील कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाल्याने दुर्घटनेची भीषणता स्पष्ट झाली.
तेलंगणा राज्यातील करीमनगर येथील चार प्रवासी TS 10 EL 0018 क्रमांकाच्या कारमधून मिरजमार्गे पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. प्रवास सुरू असताना भोसे गावच्या हद्दीतील खरसिंग फाट्याजवळील लहान पुलावर कार आली. याचवेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलाच्या संरक्षक कठड्याला जाऊन धडकली. धडकेनंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळली.या अपघातात चालक साईराव (वय ३५, रा. करीमनगर, तेलंगणा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रशांत पेरळे (वय ३०), मिथुन चंदराव (वय ३२) आणि साई भास्करकुमार (वय २९), हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी नागपूर महामार्ग कवठेमहांकाळ पोलीस मदत केंद्र पोलीस अधिकारी PSI वाघमोडे, HC १७३२ पाटील, HC १७९२ स्वामी, PN २११७ वाघमोडे आणि PC १७५६ कुमरे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, महेश गव्हाणे, सागर जाधव आणि इर्शाद कवठेकर यांनीही बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, या अपघाताच्या घटनेची नोंद मिरज ग्रामीण मध्ये झाली आहे
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
भडगाव येथे AEG फाउंडेशनच्या वतीने कृषी उद्योजकांना प्रमाणपत्रांचे वितरण . | युवरंग २०२६ वर मुळजी जेठा महाविद्यालयाची मोहोर; चोपडा महाविद्यालय उपविजेतेपदी! | एका क्षणात होत्याचे नव्हते! भरधाव कारचा भीषण अपघात; तेलंगणातील चालकाचा दुर्दैवी अंत, तिघे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे | रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देणाऱ्या कुचीच्या वैभव सरवदे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित! | कुचीमध्ये विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; गावात खळबळ! | न्यायालयाचे ‘कायदेशीर कवच’ विद्यार्थ्यांच्या दारात: भडगावमध्ये ‘सुरक्षित बचपन’ अभियानाचा दिमाखदार समारोप! | 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुंबई पोलीस दलातील PSI संजय टिबे सेवानिवृत्त | शिवसेनेच्या दोन तर भाजपच्या एका उमेदवाराची संचालकपदी निवड; पारोळा, एरंडोल आणि भुसावळमध्ये बिनविरोध विजय | सागवान लाकूड चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वनमजुरावर कुऱ्हाडीने हल्ला; दोन्ही हातांवर केले वार! | ‘दरिया’ नव्हे ‘समंदर’ शोधा; दुष्काळाचे भान आणि समतेच्या जागरानं कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘युवारंग २०२६’ चा रणगजर! |