आईने २० रुपये दिले नाहीत; रामटेक तालुक्यातील १३ वर्षीय विद्यार्थ्याचा शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू

👤 नितिन बोरसरे | 📅 15 October 2026 | 👁 23 Views
आईने २० रुपये दिले नाहीत; रामटेक तालुक्यातील १३ वर्षीय विद्यार्थ्याचा शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू
देवलापार : शाळेत जाण्यासाठी आईने २० रुपये दिले नाहीत, यावरून विचारणा झाल्यानंतर घराबाहेर पडलेल्या आठवीतील १३ वर्षीय विद्यार्थ्याने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना रामटेक तालुक्यातील पथराई येथे मंगळवारी (दि. १३) सकाळी घडली. या घटनेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्याचे नाव नैतिक संजय दशमरे असे आहे. तो पथराई (अंबाझरी) येथील नवजीवन हायस्कूलमध्ये आठव्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास नैतिक नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरून निघाला. शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या २० रुपयांवरून आईने त्याला विचारणा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर शाळेचे दप्तर आणि दुपारचा डबा घेऊन तो घराबाहेर पडला. मात्र, शाळेत जाण्याऐवजी त्याने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेतल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. नेमके कारण अद्याप अस्पष्ट
या प्रकरणी विद्यार्थ्याच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी नोंद केली आहे. २० रुपयांवरून झालेल्या बोलाचालीचा उल्लेख तक्रारीत असला, तरी या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ठाणेदार नारायण तुरुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सलिम आणि हेमंत राठोड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आईने २० रुपये दिले नाहीत; रामटेक तालुक्यातील १३ वर्षीय विद्यार्थ्याचा शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू | शाळेतून घरी परतण्याचा प्रवास एका विद्यार्थ्यासाठी अखेरचा ठरला | चांदवड तालुक्यात १४ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीची प्रसूती; नवजात बालिकेसह जिल्हा रुग्णालयात हलविले* | *कोळगावात महात्मा फुले स्मारकासाठी जागा द्या ग्रामस्थांचा इशारा* | तहसीलदार अतुल पाटोळे यांची विभागीय चौकशी करा | *लग्नाला अवघे ५ महिने, नवविवाहित दाम्पत्याची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या!* | शिरोशीतील कातकरीपाडा व काकडमाळ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप | वाडा प्रभाग क्रमांक ११ मध्ये ‘आपली नगरसेविका आपल्या दारी’ अभियान नगरसेविका सौ. सविता वनगा नागरिकांच्या समस्या जाणून घेणार | सारसून येथे आठवडी बाजार समितीचा भव्य आठवडी बाजार | भडगावात लहान मुलाच्या अपहरणाचा डाव फसला; टू व्हीलर वर आले होते दोन संशयित पालकांना सतर्कतेचे आवाहन |