भडगाव:
भडगाव शहरातील बाळद रोड, साईनगर परिसरात एका लहान मुलाचे अपहरण करण्याचा अज्ञात इसमांचा डाव थोडक्यात फसला आहे. लहान मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र नागरिकांच्या जागरूकतेमुळे किंवा इतर कारणांमुळे हा डाव यशस्वी होऊ शकला नाही. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (८ ऑक्टोबर) या परिससरात टू व्हीलर संशयास्पद रित्या फिरत होती.दोन अज्ञात व्यक्तींनी एका लहान मुलाला गाठून त्याला चॉकलेट देण्याचा आणि भुरळ घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, संशयास्पद हालचालींमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि बालकाचे अपहरण करण्याचा त्यांचा डाव पूर्णपणे फसला.
पालकांनो सावधान!
या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात 'पालकांनो सतर्क व जागरूक राहा' असे आवाहन करण्यात येत आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी खालील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे:
• मुलांशी संवाद साधा: आपल्या मुलांना अनोळखी व्यक्तींपासून दूर राहण्याची आणि त्यांच्याशी न बोलण्याची स्पष्ट माहिती द्या.
• आमिषांना बळी पडू नका: कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून चॉकलेट, बिस्किटे किंवा कोणतेही खाद्यपदार्थ न घेण्याबाबत मुलांवर संस्कार करा.
• संशयास्पद वाहनांवर लक्ष ठेवा: परिसरात विना नंबर प्लेटची किंवा संशयास्पद वाहने फिरताना दिसल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाला अथवा पोलिसांना माहिती द्या.
बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने ही माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवून सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.