नेर्ले : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने गौरव समिती, नेर्ले यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दि. 7 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, नेर्ले येथे शिक्षक दिन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री. घनश्याम सुभाष पाटील, सहायक शिक्षक यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
गौरव समितीच्या या निवडीबद्दल श्री. पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, सहकारी व नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 💐🏆