तासगाव हादरवणाऱ्या नवजात बाळाच्या अपहरणाचा अखेर निकाल; महिलेला ७ वर्षांची शिक्षा

👤 संतोष एडके तासगाव | 📅 31 August 2026 | 👁 562 Views
तासगाव हादरवणाऱ्या नवजात बाळाच्या अपहरणाचा अखेर निकाल; महिलेला ७ वर्षांची शिक्षा
तासगाव : तासगाव शहरातील सरस्वती आनंद हॉस्पिटल येथून एक दिवसाच्या नवजात पुरुष बाळाचे अपहरण केल्याप्रकरणी न्यायालयाने महिला आरोपीला दोषी ठरवत ७ वर्षांची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील सहआरोपीची मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी सुमारे ६ वाजता तासगाव येथील सिद्धेश्वर चौक परिसरातील सरस्वती आनंद हॉस्पिटल येथून नवजात पुरुष बाळाचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी बाळाची आई हर्षदा शरद भोसले, रा. चिंचणी, ता. तासगाव यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९५/२०२२ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३६३, ३०८, ३४ तसेच बाल न्याय अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान स्वाती छबुराव माने ऊर्फ स्वाती मच्छिंद्र पवार (वय ३8) रा. राष्ट्रमाता इंदिरानगर विद्यालयाच्या पाठीमागे, सिध्दार्थ नगर, मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर. सध्या किर्लोस्करवाडी, ता. पलुस. हिच्यासह अन्य आरोपींची नावे समोर आली. पोलिसांनी तपास पूर्ण करून प्रकरण न्यायालयात दाखल केले.
न्यायालयीन सुनावणीनंतर स्वाती मच्छिंद्र पवार हिला दोषी ठरविण्यात आले. भारतीय दंड संहिता कलम ३६३ अंतर्गत ७ वर्षांचा साधा कारावास व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास, तसेच बाल न्याय अधिनियमाच्या कलम ७५ अन्वये ३ वर्षांचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. सदर शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असल्याने आरोपीला एकूण ७ वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे.
दरम्यान, या प्रकरणातील सहआरोपी मच्छिंद्र पवार याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. एम. बी. कुलकर्णी व ॲड. ए. एम. साटविलकर यांनी काम पाहिले. प्रकरणाची सुनावणी मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. व्ही. निंबाळकर, सांगली यांच्या न्यायालयात झाली.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी पैरवी अधिकारी सपोनि. मुहस्सर शेख यांनी काम पाहिले. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास व पुढील कार्यवाही करण्यात आली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |