आरवडे गावाच्या नामांतराला ग्रामस्थांचा जोरदार विरोध; 'गोपाळपूर' नाव बदल रद्द करण्याची मागणी

👤 संतोष एडके तासगाव | 📅 24 August 2026 | 👁 101 Views
आरवडे गावाच्या नामांतराला ग्रामस्थांचा जोरदार विरोध; 'गोपाळपूर' नाव बदल रद्द करण्याची मागणी

​आरवडे (ता. तासगाव):
ग्रामपंचायत आरवडे यांनी २१ ऑगस्ट २०२६ रोजी घेतलेल्या ग्रामसभेत गावाचे ऐतिहासिक नाव "आरवडे" बदलून "गोपाळपूर" करण्याचा ठराव मंजूर केला आहे. मात्र, हा निर्णय अत्यंत घाईगडबडीत, बहुसंख्य ग्रामस्थांना विश्वासात न घेता व लोकशाही प्रक्रियेचा अवलंब न करता घेतला असल्याचा आरोप करत 'आरवडे गाव नामांतर विरोधी संघर्ष कृती समिती' व ग्रामस्थांनी या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे. यासंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नामांतराचा ठराव त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
​हे निवेदन गटविकास अधिकारी (पंचायत समिती तासगाव), तहसीलदार (तासगाव), प्रांत अधिकारी (मिरज), मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद सांगली) आणि जिल्हाधिकारी (सांगली) यांना सादर करण्यात आले आहे.
​ग्रामस्थांनी निवेदनात मांडलेले प्रमुख मुद्दे:
​ऐतिहासिक वारसा व ओळख: 'आरवडे' हे नाव सहस्रवर्षांचा इतिहास असलेले व जगात एकमेव नाव आहे. तासगाव पूर्व भागातील आरवडे, बलगवडे, लोढे, सावर्डे, मांजर्डे, बस्तवडे या सहा गावांच्या मालिकेत आरवडे या नाव व संस्कृतीचे विशेष स्थान आहे.
​ग्रामदैवताचे प्राचीन मंदिर: गावाच्या मध्यभागी हजार वर्षांहून अधिक प्राचीन श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर असून या धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख गावाच्या मूळ नावाशी जोडलेली आहे.
​ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष: गावात अकरावी व पुढील शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरेशा बसेस नाहीत, तसेच शेतीसाठी पाणी, रस्ते व वीज या मूलभूत सुविधांचा तुटवडा आहे. अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा न करता नामांतराच्या विषयाकडे लक्ष भरकटवले गेले.
​प्रशासकीय व आर्थिक भुर्दंड: नाव बदलल्यास ७/१२ उतारे, आधार कार्ड, मतदार यादी, मालमत्ता दस्तऐवज, शाळा-कॉलेजचे दाखले व बँकिंग कागदपत्रांमध्ये बदल करावे लागतील, ज्यामुळे ग्रामस्थांना नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागेल.
​पर्यायी तोडगा: इस्कॉन मंदिर परिसरापुरता 'गोपाळपूर' असा स्थानिक नामउल्लेख करण्यास ग्रामस्थांचा आक्षेप नाही, मात्र त्यासाठी संपूर्ण गावाचे मूळ नाव बदलणे अयोग्य आहे.
​उपोषणाचा इशारा:
ग्रामपंचायतीने २१.०८.२०२६ रोजी घेतलेला नामांतराचा ठराव त्वरित रद्द करून, गावाला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांवर चर्चा करण्यासाठी सर्वसमावेशक ग्रामसभा बोलावावी, अशी मागणी समितीने केली आहे. प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई न केल्यास सर्व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |