कोळपे मतदारसंघातील साकवांच्या कामांना मंजुरी देऊन निधी द्या; जि.प. सदस्य प्रमोद रावराणे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

👤 तुषार शिंगाडे | 📅 21 August 2026 | 👁 32 Views
कोळपे मतदारसंघातील साकवांच्या कामांना मंजुरी देऊन निधी द्या; जि.प. सदस्य प्रमोद रावराणे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी


वैभववाडी (प्रतिनिधी) : कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील स्थानिक दळणवळण व रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या साकवांच्या कामांना तातडीने मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मतदारसंघातील अनेक गावांमध्ये साकवांची नव्याने उभारणी करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच काही ठिकाणी अस्तित्वातील साकवांची देखभाल व दुरुस्ती आवश्यक असून, पावसाळ्यात नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर होतो. त्यामुळे सर्व प्रस्तावित साकवांच्या कामांना मंजुरी देऊन त्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रावराणे यांनी केली आहे.

निवेदनात मौजे वेंगसर घाडीवाडी येथे गांगेश्वर मंदिरानजिक साकव बांधणे, नानिवडे कुरणवाडी-वाणीवाडी निवळाच्या वहाळावर साकव बांधणे, तिरवडे तर्फ सौंदल होळीचा मांड-रहाटकोंडवाडी मार्गावर साकव बांधणे, मांगवली भट्टवाडी जि.प. शाळा मार्गावरील साकवाची दुरुस्ती करणे, मोंदे बावचादेवी मंदिरानजिक साकव बांधणे, दिग्शी पाष्टेवाडी श्री गांगेश्वर मंदिर मार्गावर साकव बांधणे आणि ऐनारी गांगेश्वर मंदिरानजिक साकव बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच भुईबावडा पहिलीवाडी येथील श्री. तुकाराम प्रभू यांच्या घरानजिक मार्गावर साकव बांधणे, जांभवडे पालांडेवाडी येथील साकवाची दुरुस्ती करणे, जांभवडे कोकरेवाडी येथे साकव बांधणे, कोळपे जमातवाडी-जांभळखिंड मार्गावर साकव बांधणे, हेत राववाडी-खडकवाडी मार्गावर साकव बांधणे, वेंगसर काळेश्वरी मंदिरानजिकचा साकव दुरुस्त करणे, ऐनारी गडगेवाडी येथे साकव बांधणे आणि आखवणे गुरववाडी-भोम मार्गावरील तेळसाचा गोवंड येथे साकव बांधणे, अशी विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

या सर्व कामांना प्राधान्याने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिल्यास संबंधित गावांतील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी या मागण्यांचा सकारात्मक विचार करून संबंधित साकवांच्या कामांना तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी जि.प. सदस्य प्रमोद रावराणे यांनी केली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |