सांगलीत शुक्रवारी ‘महावॉकेथॉन २०२६’ ‘वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 18 August 2026 | 👁 22 Views
सांगलीत शुक्रवारी ‘महावॉकेथॉन २०२६’ ‘वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता सांगलीत ‘महावॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंद कॉलेजच्या मागील गेट (१०० फूटी रोड) ते बापट मळा आणि पुन्हा वालचंद कॉलेज असा महावॉकेथॉनचा मार्ग राहणार आहे.
१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यभर ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार असून, जलयुक्त शिवार २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, अमृत सरोवर आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यांसारख्या उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे.
‘माती वाचवा-पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा’ हा मोहिमेचा मुख्य संदेश असून, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
महावॉकेथॉनसाठी ऑनलाइन QR कोडद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध असून सहभागी नागरिकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त राज्यभर १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह राबविला जात आहे.
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी महावॉकेथॉन आयोजित करण्यात आली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |